आपणच त्याला फोफावण्यासाठी वाव देतोय; कोरोना संकटकाळात राजकीय पक्षांचे मोर्चे कशासाठी?

कोरोना महामारीच्या संकटकाळात राजकीय पक्ष बेधडक मोठमोठे मोर्चे काढत आहेत. या पक्षांना त्यांच्या जबाबदारीची मुळीच जाणीव नाही.

  आपले नेतृत्व आणि राजकारणाचा प्रभाव जनतेवर टाकण्यासाठी या पक्षाचे नेते मोर्चे काढत आहेत, परंतु जनतेवर या मोर्चातील गर्दीचा दुष्परिणाम होईल याची या नेत्यांना मुळीच पर्वा नाही. जनतेच्या आरोग्याशी या नेत्यांनी खेळ करणे सुरू केले आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट जेव्हा संपूर्ण देशात हैदोस घालत होती, तेव्हा बंगालच्या विधानसभा निवडणुकोत निवडणूक रॅली काढण्यात येत होत्या.

  वरिष्ठ नेत्यांना कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे होत्या, परंतु तसे न करता या नेत्यांवर निवडणुका जिंकण्याचे भूत स्वार झाले होते. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा असे सांगण्याऐवजी हे नेते मोठमोठ्या सभा घेत होते. हे केवळ बंगालमध्येच नव्हते, तर संपूर्ण देशात अशीच स्थिती होती.

  भावनात्मक प्रश्‍नावर मोर्चे काढणे ही या पक्षांसाठी नवी बाब नाही. गेल्या आठवड्यात बेलापूर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. या विमानतळाला शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, हे नाव रद्द करून स्थानिक नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करीत हजारो लोकांनी मोर्चा काढला.

  मुंबई उच्च न्यायालयाने या रॅलीचा उल्लेख करून म्हटले आहे की, नेते राजकीय फायदे करून घेण्यासाठी असे मोर्चे काढत असतात. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुळकणीं यांच्या पीठाने म्हटले आहे की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या सभा व मोर्चावर बंदी घालण्यात आली आहे, असे असताना विमानतळाच्या नामकरणाबाबत रॅली काढण्याची अनुमती कशी काय देण्यात आली? या न्यायमूर्तींच्या पीठाने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना म्हटले आहे की, कोविड-१९ च्या प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असेल तर अशा रॅलीवर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्रिय होण्याची आवश्यकता आहे.

  जर सरकार हे करणार नसेल तर न्यायालयाला अशाप्रकारच्या रॅलींवर बंदी घालावी लागेल. न्यायालयाचे काही प्रोटोकॉल असतात, त्यामुळे न्यायालय पूर्ण क्षमतेनिशी काम करू शकत नाही, तथापि राजकीय नेते जर अशाप्रकारच्या रॅलींचे आयोजन करीत असतील तर आता न्यायालयांना सक्रिय व्हावे लागेल.

  We are the ones who give him space to blow Why the rallies of political parties during the Corona crisis