‘या’ लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

या दारूची निर्मिती करणारे दारूमध्ये, अल्कोहोल, धतूरा आणि युरिया यांचे मिश्रण टाकत होते. नवसागर आणि मिथाईल अल्कोहोलसुद्धा या दारूमध्ये टाकण्यात येत होते. अशीही चर्चा आहे. ही विषारी दारू प्यायल्यामुळे सर्वाधिक ५० बळी तरणतारण जिल्ह्यात गेले.

या दारूची निर्मिती करणारे दारूमध्ये, अल्कोहोल, धतूरा आणि युरिया यांचे मिश्रण टाकत होते. नवसागर आणि मिथाईल अल्कोहोलसुद्धा या दारूमध्ये टाकण्यात येत होते. अशीही चर्चा आहे. ही विषारी दारू प्यायल्यामुळे सर्वाधिक ५० बळी तरणतारण जिल्ह्यात गेले. पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. कित्येक कुटुंबातील कर्त्या पुरूषाचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला, परिणामी अनेक उद्धस्त झाले. त्या कुटुंबातील मुलं अनाथ झाली. कित्येक आईवडिलांचा म्हातारपणाचा आधार गेला. या भीषण घटनेला मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांचे सरकारच जबाबदार आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. अकाली दलाचे अध्यक्ष सुबीरसिंह बादल यांनी या विषारी दारू प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून करण्याची मागणी केली आहे. सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनाच दारूचे कंत्राट देण्यात आलेले आहे. राज्यामध्ये गुंडागर्दी आणि माफियाराज सुरू आहे, असाही आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारने ६ पोलिसांसह ७ अबकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये २ डीसीपी आणि ४ ठाणेदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी म्हटले आहे की, विषारी दारूचे उत्पादन आणि विक्री रोखण्यासाठी पोलिस आणि अबकारी विभागाचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. या दारूची निर्मिती करणारे दारूमध्ये अल्कोहोल, धतूरा आणि युरिया यांचे मिश्रण टाकत होते. नवसागर आणि मिथाईल अल्कोहोलसुद्धा या दारूमध्ये टाकण्यात येत होते, अशीही चर्चा आहे. ही विषारी दारू प्यायल्यामुळे सर्वाधिक ५० बळी तरणतारण जिल्ह्यात गेले. अन्य बळी अमृतसर आणि गुरूदासपूर जिल्ह्यातील आहेत. या भीषण घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गावखेड्यात विषारी दारूच्या भट्ट्या सुरू असतानाही पोलीस त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? एकाच वेळी १० गावे आणि २ शहरांमध्ये दारूचा पुरवठा कसा काय होतो? ३ दिवसांपूर्वी तरणतारण जिल्ह्यात विषारी दारू प्राशनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा पोलिसांनी कारवाई का केली नाही? यापूर्वी येथे अवैध दारू जप्त करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांनी ही दारू बनविणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? यापूर्वी येथे अवैध दारू जप्त करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांनी ही दारू बनविणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? पोलिसांनी ही विषारी दारू प्यायल्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतर २५ जणांना अटक केली, परंतु दारू निर्मितीवर मात्र कोणतीही बंधने लावण्यात आली नाहीत. दारूच्या आहारी गेलेले लोक दारू मिळाली नाही तर ते जी दारू मिळेल ती पितात. प्रसंगी ते विषारी दारूचेही प्राशन करतात. जेव्हा धतूरा आणि युरिया टाकून तयार केलेली दारू प्यायल्यानंतर ती दारू जीवघेणी तर ठरणारच! या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे.