अस्वस्थ सोनिया निर्णय का घेत नाहीत?

सोनिया गांधी यांनी त्यांच्या आजारपणामुळे राहुल गांधी यांना पक्ष चालविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षांवर बुजूर्ग क़ॉंग्रेस नेत्याचेच वर्चस्व कायम होते. शेवटी नाइलाजास्तव सोनिया गांधी यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कामकाज सांभाळावे लागले. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड का करण्यात आली नाही? कॉंग्रेसची मजबुरी अशी आहे की, कॉंग्रेस आधी परिवाराबाहेर आपले भविष्य बघतच नाही.

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलहाला उधाण आले आहे. कॉंग्रेस अजूनही आपली दिशा स्पष्ट करू शकत नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आजारी असतानाही सोनिया गांधी पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. हंगामी अध्यक्षपदाचा त्यांचा १ वर्षाचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपलेला आहे. या कालावधीत कॉंग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु असे काहीही घडलेले नाही. याउलट असे म्हटले जाते आहे की, लवकरच कॉंग्रेस कार्यसमितीची बैठक बोलविण्यात येईल व या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा कालावधी वाढवून देण्यात येईल. सोनिया गांधी यांनी त्यांच्या आजारपणामुळे राहुल गांधी यांना पक्ष चालविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षांवर बुजूर्ग क़ॉंग्रेस नेत्याचेच वर्चस्व कायम होते. शेवटी नाइलाजास्तव सोनिया गांधी यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कामकाज सांभाळावे लागले. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड का करण्यात आली नाही? कॉंग्रेसची मजबुरी अशी आहे की, कॉंग्रेस आधी परिवाराबाहेर आपले भविष्य बघतच नाही. कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना असे वाटते की, गांधी परिवारच कॉंग्रेसला एकसंघ ठरू शकतो. या परिवाराशिवाय कॉंग्रेस पक्ष अस्तित्वातच राहणार नाही. इ.स. १८८५ ला स्थापन झालेल्या १३५ वर्षे जुन्या कॉंग्रेसपक्षाचा हा विचार जरा विचित्रच आहे. गांधी-नेहरू कुटुंबियांव्यतिरिक्त कित्येक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. स्वातंत्र्यानंतर यु.एन.ढेबर, एन.संजीव रेड्डी, ब्रम्हानंद रेड्डी, एस. निजलिंगप्पा, देवकांत बरूआ, शंकदयाल शर्मा, सीताराम केसरी इत्यादी नेते कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. सोनिया गांधींचे स्वास्थ चांगले राहत नसतानाही त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राहुल गांधी मात्र कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याच्या बाबतीत उदासीन आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. पक्ष आणि देशहिताच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.