Mamta Banerjee PHoto

 बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जर हिंदू आहे तर 'जय श्रीराम' ही घोषणा दिल्यानंतर त्या संतप्त का होतात? 'जय श्रीराम' ही घोषणा त्यांना आव्हान देणारी का वाटत असावी? ही घोषणा दिल्यानंतर आपली बेइज्जत होत आहे, असे त्यांना का वाटत असावे बरे! त्या स्वत:ही "जय श्रीराम' असा नारा देऊन संतप्त जमावाला शांत करू शकल्या असत्या, परंतु तसे काहीही न करता सरकारी कार्यक्रमाला राजकीय कार्यक्रम करून टाकल्याचे त्या रागाने म्हणाल्या.

कार्यक्रमासाठी एखाद्या व्यक्‍तीला निमंत्रण द्यायचे अनंती व्यक्‍ती आल्यानंतर कार्यक्रमातच त्या व्यक्तीचा अपमान करायचा, हे मात्र योग्य नाही. असे म्हणून त्यांनी भाषण देणेच थांबवून दिले. ममता बॅनर्जी यांना या घोषणेमागे राजकारण आहे, असे वाटते. भाजपा, विहिंप आणि संघाच्या ज्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटना “जय श्रीराम’ अशा घोषणा देत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथे आल्यानंतर त्यांचा व्हिक्टोरिया मेमोरियळमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यावरून ममता बॅनर्जी संतप्त झाल्या व आपल्याला चिडविण्यासाठीच या घोषणा दिल्या जात असल्याचा त्यांनी आरोप केला. खरं म्हणजे रामाचे नाव श्रद्धेने घेतल्या जात असते. बंगाल दुर्गापूजेसाठी प्रसिद्ध आहे. रामकृष्ण परमहंस यांचे नाव रामाच्या नावावरून ठेवण्यात आले होते. ‘* रामाचे नाव बंगालसाठी काही नवीन नाही, तेव्हा ममताला ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्यानंतर इतके नाराज होण्याची आवश्यकता नव्हती. खरं म्हणजे ममता बॅनर्जींना राज्यातील मुस्लीम मतदारांना खुश करायचे होते.

तृणमूल काँग्रेसला ही मते जोडलेलीच राहावी, ती पक्षापासून दूर जाऊ नये ब आपली प्रतिमा धर्मनिरपेक्ष असावी, असे ममता बॅनर्जी यांना वाटत असावे. दुर्गा विसर्जनाच्या वेळी जर मोहरम हा सण आला तर ममता मोहरमची मिरवणूक काढण्यास मात्र परवानगी देत असत. ‘जय श्रीराम’ या घोषणेत ममताला राजकारण दिसते आणि या घोषणेला विरोध करण्यामध्येही त्यांचा स्वार्थ आहे. श्रीरामाळा अभिवादन करण्यासाठी लोक जय श्रीरामचा नारा देतात. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी हिंदू संघटनांनी हा नारा दिला होता व तेव्हापासून “जय श्रीराम’ ही घोषणा प्रचलित झाली आहे.