Why so much fuss over calling Singapore a variant The central government only wants to maintain the image of the india abroad Manish Sisodia

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूर येथे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सिंगापूर व्हेरिएंट म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे. असे जर आहे तर सिंगापूरमध्ये ज्या स्वरूपात कोरोना पसरलेला आहे, त्याला इंडियन व्हेरिएंट म्हटले जात असताना आक्षेप का घेतला नाही.

    जर ‘सिंगापूर व्हेरियंट’ म्हटल्यामुळे सिंगापूरला इतका त्रास होत आहे तर ‘इंडियन व्हेरियंट’ म्हटले तर भारताला वाईट वाटणार नाही का? सिंगापूरमध्ये ‘कोविड-१९ चा नवीन स्ट्रेन बी १.१६७ हा लहान मुलांना सर्वाधिक प्रभावित करत असल्यामुळे केजरीवाल यांनी सहज हा शब्दप्रयोग केला. सिंगापूर येथून येणारी विमाने रद्द करण्यात यावी. कारण तेथून येणार्‍यांसोबत भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि ही तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरणारी असेल.

    केजरींच्या या विधानामुळे सिंगापूर या लहानशा देशाचा तिळपापड उडाला. सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुकतांकडे याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त सिंगापूरवरून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्‍यता असल्याचा केजरींचा दावा सिंगापूर सरकारने ट्विट करून फेटाळून लावला आहे. सिंगापूर सरकारनेही केजरींच्या वक्तव्यावर तीत्र आक्षेप घेतल्यानंतर भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी केजरीवालांना फटकारले आणि विदेशांशी संबंधित कोणत्याही मुद्दयावर टिप्पणी न करण्याचा इशारा दिला. केजरीवालांच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या उभय देशांच्या संबंधामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सिंगापूर हा भारताचा महत्त्वाचा सहकारी आहे.

    दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भारत सरकारच्या वतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची ‘कोरोना व्हेरियंट’ आणि ‘नागरी उडुाण’ धोरणाबद्दल कोणतीही पात्रता नाही. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री बिवियन बालकृष्णन यांनी म्हटले आहे की, कोणतेही सिंगापूर व्हेरियंट नाही. त्यांनी ‘नेचर’ या मासिकातील एका लेखाचा दाखला देताना म्हटले आहे की, या लेखांमध्ये ‘इंडियन व्हेरियंट’ हा शब्दप्रयोग केलेला आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्याला उत्तर देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, केजरीवालांनी जी टिप्पणी केलेली आहे, ती देशातील बालकांच्या चिंतेतून आहे. केंद्र सरकारला केवळ विदेशात देशाची प्रतिमाच सांभाळायची आहे.

    Why so much fuss over calling Singapore a variant The central government only wants to maintain the image of the country abroad Manish Sisodia