Will Kashmiri Pandits return home again
काश्मिरी पंडित पुन्हा स्वगृही परतणार का?

अतिरेक्यांच्या दहशतीमुळे खोऱ्यातील ३लाख काश्मिरी पंडितांनी घरे-दारे सोडून पलायन केले होते. या काश्मिरी पंडितांनी जम्मू आणि दिल्ली येथे शरणार्थी शिबिरात आश्रय घेतला होता. सरकार आणि मानवाधिकार आयोगानेही या पंडितांच्या दुर्दशेकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी तेथील राजकीय नेतृत्वही हिंदूंची बाजू उचलून धरणाऱ्यांना सांप्रदायिक ठरवित होते.

अतिरेक्यांच्या दहशतीमुळे खोऱ्यातील ३लाख काश्मिरी पंडितांनी घरे-दारे सोडून पलायन केले होते. या काश्मिरी पंडितांनी जम्मू आणि दिल्ली येथे शरणार्थी शिबिरात आश्रय घेतला होता. सरकार आणि मानवाधिकार आयोगानेही या पंडितांच्या दुर्दशेकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी तेथील राजकीय नेतृत्वही हिंदूंची बाजू उचलून धरणाऱ्यांना सांप्रदायिक ठरवित होते.

काश्मीर खोरे सोडून काश्मिरी पंडितांना ३० वर्षे झालेली आहेत. त्यांना पुन्हा काश्मीर खोऱ्यात परत आणण्यासाठी खूप घोषणा करण्यात आल्या, परंतु ते परत खोऱ्यात परततील काय? हा प्रश्न मात्र अजूनही शिल्लक आहे. काश्मीर खोऱ्यात परतल्यानंतर त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे का की, पुन्हा ते अतिरेक्यांच्या कारवायांचे बळी ठरतील? दुधाने तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यावे लागते.

जानेवारी १९९० मधील काश्मीर खोऱ्यातील शेकडो हिंदूंवर हल्ले करून त्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये न्यायाधीश, दूरदर्शनचे निदेशक, केंद्रीय कर्मचारी, राजकीय नेते शिक्षक आणि साहित्यकारांचा समावेश होता. खोऱ्यातील हिंदूंच्या संपत्तीवर अतिरेक्यांनी कब्जा केला होता. महिलांवर अत्याचार करण्यात आले होते. २४ तासांत काश्मीर सोडा अन्यथा मरण्यास तयार राहा अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. सर्वत्र अराजकता पसरली होती. संपूर्ण प्रशासन ठप्प झाले होते. राजकीय नेते मात्र हा सारा अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहत होते.

अतिरेक्यांच्या दहशतीमुळे खोऱ्यातील ३ लाख काश्मिरी पंडितांनी घरे-दारे सोडून पलायन केले होते. या काश्मिरी पंडितांनी जम्मू आणि दिल्ली येथे शरणार्थी शिबिरात आश्रय घेतला होता. सरकार आणि मानवाधिकार आयोगानेही या पंडितांच्या दुर्दशेकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी तेथील राजकीय नेतृत्वही हिंदूंची बाजू उचलून धरणाऱ्यांना सांप्रदायिक ठरवित होते. या लाखो काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीकडे तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही. संपूर्ण खोऱ्याला मुस्लिमबहुल बनविण्याच्या इराद्याने काश्मिरी पंडितांना हकलून लावण्याचे कुटील कारस्थान रचले गेले होते. आता मात्र काश्मिरी पुन्हा काश्मिरात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे की, काश्मिरी पंडितांसाठी नव्याने घरे बांधण्याचे काम सुरू आहे. आगामी वर्षभरात काश्मिरी पंडित पुन्हा खोऱ्यात परततील. काश्मीरी मुसलमानही काश्मीरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात आणले जावे या मताचे आहेत. या पंडितांना खोऱ्यातून हाकलून लावण्याचे कारस्थान अतिरेक्यांनी रचले होते. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्थानिक बँकांना असे निर्देश दिले आहेत की, जे पंडित व्यवसाय करू इच्छित असतील त्यांना बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे. आता पुन्हा काश्मिरी पंडित खोऱ्यात परतणार आहे का, हेच आता बघायचे आहे.