rahul and yogi

राज्यात जणू हुकूमशाही राजवटच सुरु आहे. लोकशाही, नागरिक स्वातंत्र्य आणि विरोधी पक्ष नेत्यांचे अधिकार याबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथांना काही भानच राहिलेले नाही. निरंकुश सामंतवादाचे भूत त्यांच्यावर स्वार झालेले आहेत. त्यांच्या या निरंकुश एकाधिकारशाहीला पंतप्रधान मोदींचे अभय मिळालेले आहे का?

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हे सर्व सहन केले, परंतु योगी सरकारने (Yogi Government) मात्र यासंबंधाने विचार करायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हाथरस (Hathras rape case) पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ नये, यासाठी हे सर्व करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राज्यात जणू हुकूमशाही (dictatorship) राजवटच सुरु आहे. लोकशाही, नागरिक स्वातंत्र्य आणि विरोधी पक्ष नेत्यांचे अधिकार याबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथांना काही भानच राहिलेले नाही. निरंकुश सामंतवादाचे भूत त्यांच्यावर स्वार झालेले आहेत. त्यांच्या या निरंकुश एकाधिकारशाहीला पंतप्रधान मोदींचे अभय मिळालेले आहे का? कोणत्याही राज्याचे पोलिस त्यांच्या विष्ठांच्या आदेशांशिवाय काहीही करु शकत नाही. उत्तरप्रदेशात पोलिसांनी अपराध्यांना जणू पूर्णपणे मोकळीकच दिलेली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांची कॉलर पकडून धक्के मारले जातात. त्यांना मारझोड केली जाते. त्यांना खाली पाडले जाते. काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरस येथे पिडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांच्यासोबत जो दुर्व्यवहार कोला तो अत्यंत निंदनीय आहे. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी त्यांना खाली पाडले. इतके सर्व झाल्यानंतरही राहुल गांधींनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जायचे आहे. असे सांगितले. राहुल गांधींना हे सर्व सहन केले, परंतु योगी सरकारने मात्र यासंबंधाने विचार करायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ नये, यासाठी हे सर्व करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. हे कुटुंबीय विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीला भेटू नये, यासाठी उत्तरप्रदेश सरकारने ही सर्व व्यवस्था केलेली आहे. योगी सरकार हे प्रकरण दडपून टाकण्याच्या तयारीत आहे. पीडितेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यासोबत दुष्कर्म झाले नाही. असे नमूद करण्यात आले आहे. परंतु पीडितेने मृत्यूपूर्व जे बयाण दिलेले आहे. त्यामध्ये तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ४ जणांची नावे सांगितलेली आहेत. या पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिची जीभ कापण्यात आली आणि मानेचे हाडही तोडून टाकण्यात आले होते. मग डॉक्टरांनी जो पोस्टमार्टम दिला आहे. तो दबावाखाली दिला आहे का? सर्वात महात्त्वाची बाब म्हणजे पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे न सोपविता रुग्णालयातूनच तो परस्पर नेऊन जाळून टाकण्यात आला होता. अशाप्रकारे उत्तरप्रदेशात सुरु असलेले जंगलराज कोण सहन करणार?