दहावीचा निकाल उद्या जाहिर होणार, असा पाहा निकाल

दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली.

  महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वाजता जाहीर होणार आहे. या संदर्भातील राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

  यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ साली एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. एकूण आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

  दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली.

  असे करण्यात आले मुल्यमापन

  विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण

  विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण

  विद्यार्थ्याचा 9 वीचा विषयनिहाय अंतिम निकाल – 50 गुण

  असा पाहा तुमचा निकाल

  राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे. https://mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा निकाल पाहाता येणार आहे.