प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

या सर्वेक्षणाच्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास आले की, ५९% प्रतिसादकांचे महामारीमुळे त्‍यांच्‍या मुलांचे शिक्षणासंदर्भात नुकसान होत असल्‍याचे मत होते, तर मुंबईतील ६७% पालक त्‍यांच्‍या मुलांना शाळेत पुन्‍हा पाठवण्‍यास तयार आहेत. त्‍यांचा विश्‍वास आहे की, शाळा पुन्‍हा सुरू झाल्‍या तरच मुलांना योग्‍यरित्‍या शिक्षण मिळू शकते.

  • प्राथमिक व माध्‍यमिक शाळांमधील विद्यार्थ्‍यांच्‍या ५९% टक्‍के पालकांच्‍या मते मुलांचे शिक्षणासंदर्भात नुकसान होत आहे
  • २२% पालकांच्‍या मते, विद्यार्थ्‍यांच्‍या संपूर्ण उपस्थितीसाठी शालेय कर्मचारीवर्गाचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे
  • पालकांकडून सोशल डिस्‍टन्सिंग, हेल्‍थकेअर सुविधा व स्पोर्ट्सला समान महत्त्व

मुंबई : राज्‍य सरकार (state government) हळूहळू लॉकडाऊन निर्बंध शिथील (Lockdown restrictions relaxed) करत असताना आणि शाळा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने जवळपास १८ महिन्‍यांनंतर पुन्‍हा सुरू होत असताना एडटेक प्रमुख कंपनी लीडने (Lead) पालकांचे सर्वेक्षण (parents survey) करून त्‍यांचे मुलांना शाळेत पाठवण्‍यासंदर्भात मत जाणून घेतले.

या सर्वेक्षणाच्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास आले की, ५९% प्रतिसादकांचे महामारीमुळे त्‍यांच्‍या मुलांचे शिक्षणासंदर्भात नुकसान होत असल्‍याचे मत होते, तर मुंबईतील ६७% पालक त्‍यांच्‍या मुलांना शाळेत पुन्‍हा पाठवण्‍यास तयार आहेत. त्‍यांचा विश्‍वास आहे की, शाळा पुन्‍हा सुरू झाल्‍या तरच मुलांना योग्‍यरित्‍या शिक्षण मिळू शकते.

मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील (metro and non metro cities) इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्‍या (I To X std) मुलांच्‍या १०,५०० पालकांचे सर्वेक्षण करण्‍यात आले.

मुलांचे आरोग्‍य व सुरक्षितता लक्षात घेत लीडच्‍या सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, २२% पालकांनी शालेय कर्मचा-यांचे लसीकरण होण्‍याला अधिक प्राधान्‍य दिले. मेट्रो शहरांमधील ५५% पालकांनी सोशल डिस्‍टन्सिंगला अधिक महत्त्व दिले आणि त्‍यानंतर हेल्‍थकेअर सुविधांना (५४%) प्राधान्‍य देण्‍यात आले. नॉन-मेट्रो शहरांमधील पालकांनी (५२%) क्रीडा व सोशल डिस्‍टन्सिंगला समान महत्त्व दिले.

महामारीदरम्‍यान मुले व पालकांना सामना करावी लागलेली आव्‍हाने, तसेच महामारीच्‍या सुरूवातीच्‍या दिवसांमध्‍ये त्‍यांची ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘स्‍कूल फ्रॉम होम’ संदर्भात झालेली धावपळ प्रकाशझोतात आणत सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, मेट्रो शहरातील ४७% पालकांनी त्‍यांच्‍या मुलांच्‍या शाळेमध्‍ये दिवसातून ३ ते ४ तास व्‍यतित केले, तर मेट्रो शहरांमध्‍ये हे प्रमाण ४४% होते. तसेच सर्वेक्षणाने निदर्शनास आणले की, बहुतांश पालकांचे (६३%) मत होते की प्रत्यक्ष क्‍लासरूममध्‍ये उपस्थित असल्‍यास मुलांमध्‍ये उत्तम सोशल इंटरॲक्‍शन गुण निर्माण होतील.

लीडचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्‍हणाले, ”मागील दीड वर्ष शिक्षक, मुख्‍याध्‍यापक, शाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे विद्यार्थ्‍यांसाठी सोपे राहिले नाही. अल्‍प उत्‍पन्‍न गटातील मुलांचे डेटा व डिवाईसेसच्‍या अनुपलब्‍धतेमुळे शैक्षणिक नुकसान झाले. आमचे सर्वेक्षण स्‍पष्‍टपणे निदर्शनास आणते की, मुंबईतील ६७% पालकांचा त्‍यांच्‍या मुलांना शाळेत पुन्‍हा पाठवण्‍यासाठी ‘होकार’ आहे. ३३% पालक त्‍यांच्‍या मुलांना शाळेत पाठवण्‍यास तयार नाहीत, याबाबत पालकांचे मत देखील विचारात घेतले पाहिजे. म्हणूनच ऑनलाइन शिक्षण सुरुच ठेवले पाहिजे. शाळांना आवश्‍यक युटिलिटीज म्‍हणून महत्त्व दिले पाहिजे आणि पालकांनी सकारात्‍मक व खुल्‍या मनासह त्‍यांच्‍या मुलांना शाळेत पाठवले पाहिजे. चला तर मग, सर्व आवश्‍यक खबरदारी व सुरक्षितताविषयक उपाय घेत शाळेमध्‍ये त्‍यांचे पुन्हा स्‍वागत करण्‍याची तयारी करूया.”

नॉन-मेट्रो शहरांमधील पालकांमध्‍ये सर्वाधिक निराशा

नॉन-मेट्रो शहरांमधील फक्‍त ४०% पालक म्‍हणाले की त्‍यांची मुले पर्सनल कम्‍प्‍युटरवर शिक्षण घेतात, तर मेट्रो शहरांमधील ६०% पा‍लकांनी सांगितले की लॉकडाऊनला एक वर्ष झाले असताना देखील त्‍यांची मुले कम्‍प्‍युटर/ लॅपटॉपवर शिक्षण घेत आहेत. नॉन-मेट्रो शहरांमधील बहुतांश विद्यार्थ्‍यांनी स्‍मार्टफोन्‍सच्‍या माध्‍यमातून शालेय शिक्षण घेतले, ज्‍यामुळे पालकांच्‍या चिंतेमध्‍ये अधिक वाढ झाली.

डेटामधून निदर्शनास येते की, मुलांचे व्‍हर्च्‍युअल अध्‍ययन वातावरण भावी कौशल्‍ये अवगत करण्‍यासंदर्भात मेट्रो शहरांतील पालकांच्‍या तुलनेत नॉन-मेट्रो शहरांमधील पालकांसाठी अधिक चिंताजनक राहिले आहे. मेट्रो शहरामधील ५३% पालकांनी समस्‍या निवारण व तार्किक विचार यांना सर्वात महत्त्वपूर्ण कौशल्‍य मानले, तर नॉन-मेट्रो शहरांमध्‍ये हे प्रमाण ४७% होते. त्‍याचप्रमाणे मेट्रो शहरांमधील ५०% हून अधिक पालकांना डिजिटल साक्षरता अधिक महत्त्वपूर्ण कौशल्‍य वाटले, तर नॉन-मेट्रो शहरांमध्‍ये हे प्रमाण फक्‍त ४५% होते. व्‍यावसायिक शिक्षण व कौशल्‍ये, नैतिक श्रवण व कोडिंग आणि कम्‍प्‍युटेशनल स्किल्‍स या काही इतर कौशल्‍यांना मेट्रो शहरातील पालकांनी महत्त्व दिले.

काही सामान्‍य चिंता

मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील ७०% पालकांनी सांगितले की, पालकांनी त्‍यांच्‍या मुलांच्‍या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. मेट्रो शहरांमध्‍ये ‘फक्‍त आईनेच’ मुलांचा अभ्‍यास घेण्‍याचे प्रमाण सर्वाधिक (२१%) होते, तुलनेत नॉन-मेट्रो शहरांमध्‍ये हे प्रमाण कमी (१८%) होते. ज्‍यामधून विशेषत: कामकरी महिलांमध्‍ये आपल्‍या मुलांच्‍या शिक्षणाबाबत जबाबदाऱ्या वाढल्‍याचे दिसून आले.