साई विद्यापीठाची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकरिता, SaiU द्वारे सॅट/ॲक्ट/पियरसन अंडर ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षांवर आधारीत (संबंधित अभ्यासक्रमानुसार) प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  • येथे आहेत कला आणि विज्ञानासह, कंप्युटिंग आणि डेटा सायन्स, लॉकरिता देखील कल्पक आणि प्रगतीशील असे अभ्यासक्रम

चेन्नई : साई विद्यापीठ हे भारतातील सर्वात नूतनम आणि खाजगी जागतिक विद्यापीठ आहे, आणि त्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमांकरिता वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. साई विद्यापीठ (SaiU) येथे तीन विभाग आहेत- कला आणि विज्ञान, कंप्युटिंग आणि डेटा सायन्स आणि विधी, या तीनही विभागांद्वारे कल्पक आणि प्रगतीशील असे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत, ज्यामुळे उद्याचे उत्तम नेतृत्व तयार होऊ शकेल.

कला आणि विज्ञान विभागामध्ये, अंत:विषय हे मानवता, समाज शास्त्र, विज्ञान, कला आणि कम्युटिंग तंत्रज्ञान असणार आहेत. कंप्युटिंग डेटा सायन्स हा त्या विभागातील प्रयोगात्मक आणि अभ्यासात्मक असा सखोल अभ्यास प्रदान करेल जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स. लॉ(विधी) या विभागामध्ये मिश्र पद्धतीचे शिक्षण असेल, ज्याच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती आणि चालू योजनांचा अभ्यास करता येऊ शकेल.

सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकरिता, SaiU द्वारे सॅट/ॲक्ट/पियरसन अंडर ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षांवर आधारीत (संबंधित अभ्यासक्रमानुसार) प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

साई विद्यापीठामध्ये शिकविणारा शिक्षक वर्ग हा उच्च शिक्षित आणि नामांकित असे शिक्षक असणारा आहे. SaiU च्या विद्यार्थ्यांना जगभरातील विविध प्राध्यापकांशी ओळख करून घेता येऊ शकेल ज्यामुळे विविध विषयांमधील बहुविविधता आणि बहुआयाम त्यांना शिकता येऊ शकतील. शिक्षक आणि उद्योग जगतातील प्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आपला असा एक ठसा उमटविला आहे, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतील आणि त्यांच्या मनाला उद्याचे नेतृत्व बनविण्याकरिता म्हणून तयार करतील.

आपल्या विविध शैक्षणिक अनुभवांच्यामध्यमांनी शिक्षण प्रदान करण्यासह, SaiU द्वारे विविध पाठ्यक्रम हे प्रायोगिक आणि बौद्धिक स्तरांवर देखील शिकविले जातील जसे पाणी, वातावरणीय बदल, नामशेष होत चाललेल्या प्राण्यांच्या जाती, गरिबी, मानव अधिकार, महिला आणि लैंगिकतेवर आधारित हक्क आणि महामारी, सारख्या विविध प्रश्नांवर विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येऊ शकतील. हे अभ्यासक्रम तज्ञ अशा समूहाद्वारे आणि विविध क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींद्वारे शिकविले जातील. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरवार माहिती मिळावी म्हणून SaiUद्वारे परदेशातील अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या विद्यापीठांना भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

आपले विचार मांडताना, साई विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू के.वी रामाणी म्हणाले, “ आज कंपन्या आणि संस्था व्यवसायाकरिता तयार अशा व्यक्तींना शोधतात. जेव्हा आपण व्यवसायाकरिता तयार असे म्हणतो याचा अर्थ हा पाठ्यक्रमातील अभ्यास असे होत नाही, तर विद्यार्थ्यांकडून कठीण अशा परिस्थितीवर तोडगा काढण्याची क्षमता असावी असे देखील म्हटले जाते. साई विद्यापीठामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना त्या अर्थाने तयार करू इच्छितो.”

रामाणी पुढे म्हणाले,” आम्हाला शिक्षणाचे अनुकूल असे वातावरण निर्माण करायचे आहे, जिथे विद्यार्थ्यांना कठीण अशा परिस्थितीमध्ये विचार करून, योग्य पद्धतीने त्यांची हाताळणी करत उत्तम प्रकारे त्या सम्स्या सोडवायच्या देखील आहेत. साई विद्यापीठामध्ये बौद्धिक शिक्षणासह, सांस्कृतिक पद्धतीने कसे शिकता येऊ शकेल याचा विचार केला गेला आहे. या शिवाय आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही संपूर्ण शैक्षिणक अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे त्यांना उत्तम जागतिक नागरिक बनता येऊ शकेल”