इयत्ता १२ वीच्या सर्व बोर्डाच्या परीक्षा रद्द, ICSE बोर्डाचाही समावेश

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता निकालावर काम करण्यात येत आहे. या निर्णयाबाबत CISCE चे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युएल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कोणत्या निकषांवर गुण द्यावेत तसेच त्यांचा निकाल कसा तयार करावा याबाबत निर्णय बाकी असल्याचं सांगितलं.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध बोर्डाच्या परीक्षा मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसई आणि सीआयएससीईचा (CISCE) समावेश असून या मंडळाने १२ बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयानंतर आता इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे.

     

    निकालावर काम करण्यास सुरुवात
    काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता निकालावर काम करण्यात येत आहे. या निर्णयाबाबत CISCE चे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युएल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कोणत्या निकषांवर गुण द्यावेत तसेच त्यांचा निकाल कसा तयार करावा याबाबत निर्णय बाकी असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठीचे निकष तसेच गुणांकन पद्धती लवकरच ठरवली जाईल, असे इमॅन्युएल म्हणाले.