अमृता विश्व विद्यापीठमला नॅककडून A++ मानांकन

गेल्या १८ वर्षांच्या इतिहासात अमृता विश्व विद्यापीठम् ने नॅककडून तिसऱ्यांदा ‘ग्रेड ए’ संस्थेचा दर्जा मिळवला आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये नॅकच्या विश्लेषणात ग्रेड ए रेटिंग मिळाले होते. यामुळे उच्च शिक्षणासाठीचे हे विद्यापीठ ए++ रेटिंग मिळवणारे भारतातील सर्वात तरुण विद्यापीठ ठरले आहे.

  • हा सन्मान मिळवणारे देशातील सर्वात तरुण विद्यापीठ
  • २००९ आणि २०१४ नंतर तिसऱ्यांदा संस्थेला नॅककडून ए दर्जा प्रदान
  • ४ सीजीपीएपैकी ३.७ चा दमदार स्कोअर

मुंबई : अमृता विश्व विद्यापीठम् या २०२० एनआयआरएफ रँकिंगमध्ये भारतातील चौथ्या सर्वोत्तम विद्यापीठाचा सन्मान मिळवणाऱ्या विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडेशन कौन्सिलकडून (एनएएसी) ए++ ही सर्वोच्च ग्रेड आणि ४ कम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट अव्हरेजपैकी (सीजीपीए) ३.७ चा आकर्षक स्कोअर मिळाला आहे.

गेल्या १८ वर्षांच्या इतिहासात अमृता विश्व विद्यापीठम् ने नॅककडून तिसऱ्यांदा ‘ग्रेड ए’ संस्थेचा दर्जा मिळवला आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये नॅकच्या विश्लेषणात ग्रेड ए रेटिंग मिळाले होते. यामुळे उच्च शिक्षणासाठीचे हे विद्यापीठ ए++ रेटिंग मिळवणारे भारतातील सर्वात तरुण विद्यापीठ ठरले आहे.

अमृता विश्व विद्यापीठम् चे उपकुलगुरू डॉ. पी. वेकंट रंगन म्हणाले, ‘२००३ मध्ये स्थापना झाली असूनही नॅककडून ए++ हे सर्वोच्च रेटिंग मिळवणे आमच्यासारख्या तरुण विद्यापीठासाठी मोठा सन्मान आहे. हे आम्ही पालन करत असलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यावसायिकतेच्या जागतिक मापदंडांला मिळालेली पावती आहे. याचे सर्व श्रेय आमच्या कुलपती अमृतानंदमयी देवी यांचे नेतृत्व आणि दूरगामी दृष्टीकोनाचे आहे. विद्यापीठाच्या मिशनची पाळेमुळे ‘आयुष्यासाठीचे शिक्षण’ आणि ‘सामाजिक लाभासाठी संशोधन’ यात रूजलेली असून त्यांनी जगभरातील उच्चशिक्षित शिक्षकांना भारतात परत येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विस्तारित अनुभव देण्यास प्रेरित केले आहे.’

नॅक ही युजीसीद्वारे निधी दिली जाणारी स्वायत्त संस्था असून ती भारतातील उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा व गुणवत्तेचे मूल्यांकन करते. मान्यता प्रक्रियेमध्ये विविध निकषांनुसार विश्लेषण केले जाते व त्यात अभ्यासक्रम, शिक्षण, मूल्यांकन, संशोधन, नाविन्य, पायाभूत सुविधा, विद्यार्थी सहाय्य, प्रशासन व संस्थात्मक मूल्यांचा समावेश आहे.

विश्लेषणानंतर विद्यापीठांना नॅकद्वारे ८ पैकी एक ग्रेड दिली जाते व त्यात ए++, ए+, ए, बी++, बी+, बी, सी आणि डी यांचा समावेश असतो. ‘ए’ मालिकेतील ग्रेड्स असलेल्या संस्था शिक्षण व सुविधांबाबतीत असामान्य दर्जाचे पालन करणाऱ्या असतात. ३.७६ आणि ४.०० दरम्यानचा सर्वाधिक सीजीपीए असणाऱ्या विद्यापीठांना ए++ ही सात निकषांवरील सर्वोच्च मान्यता असलेली ग्रेड दिली जाते.