प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

दिल्ली :  देशात कोरोना महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चा पसरत होत्या. सीबीएसईने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच, विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी सीबीएसईतर्फे डिजिटल हॉल तिकीट (प्रवेश पत्र) दिले जाईल. हे हॉल तिकीट मान्यताप्राप्त शाळेच्या लॉगिनवर पाठविले जाईल. यानंतर शाळा विद्यार्थ्यांना डिजिटल प्रवेश पत्रे पाठवेल.

पालकांची स्वाक्षरी अनिवार्य

विद्यार्थी आपले हॉल तिकीट शाळेच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील. प्रवेश पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार नाही. अ‍ॅडमिट कार्ड शाळेकडून युजर आयडी व पासवर्डद्वारे मिळविले जाईल. या वेळी सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र देताना बदल केला आहे. यावेळी प्रवेशपत्र मुख्याध्यापकांच्या डिजिटल स्वाक्षरीसह विद्यार्थ्यांना मिळेल. यानंतर अॅडमिट कार्डवर विद्यार्थी आणि पालकांची सही करावी लागेल. मंडळाच्या म्हणण्यानुसार, पालकांची स्वाक्षरीसुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे.

कोरोनापासून बचावासाठी माहिती

प्रवेश पत्रावर यावेळी कोरोना संसर्ग रोखण्याविषयी माहिती दिली जाईल. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती असेल. केंद्रापर्यंत पोहोचण्याची वेळ, परीक्षा हॉलमध्ये जाण्याची वेळ, प्रश्नपत्रिका घेण्याची वेळ इत्यादींचा उल्लेखही केला जाईल. यासह मास्क, हॅण्ड सॅनिटायझर इत्यादींची माहिती उपलब्ध होईल.