एमपीएससीने जाहीर केल्या परीक्षेच्या तारखा ; राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ची नवी तारीख १४ मार्च २०२१ अशी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० ही परीक्षा २७ मार्च तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० आता ११ एप्रिल दिवशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीवरून राज्यात एमपीएससी परीक्षा २०२० सातत्याने लांबणीवर पडल्या होत्या. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ची नवी तारीख जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० ही परीक्षा २७ मार्च तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० आता ११ एप्रिल दिवशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुढील अपडेट्ससाठी परिक्षार्थ्यांनी mpsc.gov.in ला वेळोवेळी भेट देण्याचं आवाहन केले आहे.

दरम्यान, एमपीएससीला यापूर्वी ४ वेळा परीक्षेच्या तारखा बदलाव्या लागल्या आहेत. राज्य सरकारने यापूर्वी १० ऑक्टोबरला परिपत्रक काढून ११ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलत असल्याचं सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक परिपत्रक काढून वयोमर्यादेची आणि किती वेळा परीक्षा दिली जाऊ शकते याची देखील माहिती दिली होती.महाराष्ट्रात अद्याप मराठा आरक्षणाचा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे २५ जानेवारीपासून त्याच्या अंतिम सुनावणीला सुरूवात होत आहे.