आयआयटी-जेईईचा अभ्यासक्रम बदलणार ?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे शाळा सुरु होण्यास विलंब होत असल्याने, सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम ३० टक्के कमी केला आहे. हा अभ्यासक्रम कमी केल्यापासून IIT- JEE अभ्यासक्रमातही बदल व्हावा, अशी मागणी सुरु आहे. कारण आयआयटी जेईईचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमावरच आधारीत असल्याने या परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे शाळा सुरु होण्यास विलंब होत असल्याने, सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम ३० टक्के कमी केला आहे. हा अभ्यासक्रम कमी केल्यापासून IIT- JEE अभ्यासक्रमातही बदल व्हावा, अशी मागणी सुरु आहे. कारण आयआयटी जेईईचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमावरच आधारीत असल्याने या परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबतही  संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान JEE Advanced परीक्षांचे आयोजन करणाऱ्या आयआयटीने  तज्ज्ञ समितीसमोर नवा अभ्यासक्रम पुनरावलोकनासाठी मांडला आहे. 

याबाबत आयआयटी म्हणत आहे की ,  “अभ्यासक्रमाचा Syllabus तसेच त्यातील बदल प्रश्नसंच तयार कराव्या लागणाऱ्या समिती  समोर मांडावे लागेल. कारण त्यांना JEE  advanced प्रश्नपत्रिका तयार करण्यापूर्वी  हे समजले पाहिजे की काही विषय यापुढे अभ्यासक्रमाचा भाग नाहीत. यावर आता तज्ज्ञामार्फत चर्चा होणे महत्त्वाचे आहे “

काय बोलले एनटीए (NTA)

JEE Main  आयोजित करणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा आम्ही सीबीएसईच्या बदललेल्या अभ्यासक्रमाशी सध्याचा  अभ्यासक्रम compare केला तेव्हा आम्हाला मोठा फरक दिसला. विद्यार्थी या परीक्षांची तयारी अगोदरच सुरू करतात. अशा परिस्थितीत अभ्यासक्रमातील बदलांकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही. ‘त्याचबरोबर एनटीएचे महासंचालक विनीत जोशी म्हणाले की, ‘आम्ही ही बाब संयुक्त प्रवेश मंडळाकडे (JAB) घेऊन जाणार आहोत.’

यावर्षी होणाऱ्या  परीक्षेवर परिणाम नाही 

यावर्षी होणाऱ्या JEE main and advanced परीक्षेमध्ये कुठलाच बदल होणार नसून परीक्षा पूर्वीच्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे  आगामी होणाऱ्या  सीबीएसई अभ्यासक्रम बदलामुळे या वर्षी JEE Main  आणि Advanced  परिणाम होणार नाही.