jee advanced 2020

२७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आली होती. भारतासह परदेशातही काही केंद्रे होती. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १,५१,३११ विद्यार्थी पेपर १ मध्ये तर १,५०,९०० विद्यार्थी पेपर २ मध्ये सहभागी झाले होते.

मुंबई : आयआयटी दिल्लीने जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर (JEE Advanced Result 2020) केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई (IIT Mumbai) झोनमधून चिराग फेलोर हा विद्यार्थी अव्वल आहे. चिरागला ३९६ पैकी ३५२ गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये आयआयटी रुरकी झोनमधून कनिष्का मित्तल पहिली आली आहे. तिला ३९६ पैकी ३१५ गुण मिळाले आहेत. जेईई ॲडव्हान्स्ड २०२० साठी ओव्हरऑल टॉपर चिराग फेलोर हाच आहे. कनिष्काचा ओव्हरऑल रँक १७ आहे.

२७ सप्टेंबर २०२० रोजी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आली होती. भारतासह परदेशातही काही केंद्रे होती. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १,५१,३११ विद्यार्थी पेपर १ मध्ये तर १,५०,९०० विद्यार्थी पेपर २ मध्ये सहभागी झाले होते.

कसा डाऊनलोड कराल Jee Advanced Result 2020?

– जेईई ॲडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. थेट लिंक या बातमीच्या अखेरीत दिली आहे.
– JEE Advanced Result 2020 या पर्यायावर क्लिक करावे.
– जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळालेला ॲप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.
– आता तुमचा जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
– निकाल डाऊनलोड करावा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवावे.
JEE Advanced निकाल – http://result.jeeadv.ac.in/