कविता कुळकर्णी यांना संगीत विषयातील डॉक्टरेट

भांडुप येथील पराग विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कविता राजीव कुळकर्णी यांना मुंबई विद्यापीठाने शास्त्रीय संगीतातील पीएच. डी. पदवी बहाल केली आहे.

भिवंडी : भांडुप येथील पराग विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कविता राजीव कुळकर्णी यांना मुंबई विद्यापीठाने शास्त्रीय संगीतातील पीएच. डी. पदवी बहाल केली आहे.

‘मराठवाड्यातील निवडक वाग्गेयकारांच्या काही बंदिशी व त्यांचे सद्यःस्थितीतील महत्त्व’ या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध  मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील प्रा. डॉ. मनीषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाकडे सादर केला होता.

टाळेबंदी असल्याने विद्यापीठाने त्यांची पी.एचडीची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील ऑनलाईन पध्दतीने अशा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या.

मराठवाड्यातील प्रतिथयश गायक सूरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांच्याकडे त्यांचे संगीत अलंकारपर्यंतचे शिक्षण झाले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.