आज आरटीई प्रवेशांची लॉटरी

आरटीई’ प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली. प्रवेशासाठी ९ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली असून एकूण ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध झाल्या. त्यानंतर पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३ ते ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. दिलेल्या मुदतीत तब्बल २ लाख २२हजार ३५२ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मुंबई : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविण्यात येत असलेल्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठीची लॉटरी बुधवारी जाहीर केली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ही सोडत दरवर्षीप्रमाणे सभागृहात न होता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काढण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

    आरटीई’ प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली. प्रवेशासाठी ९ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली असून एकूण ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध झाल्या. त्यानंतर पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३ ते ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. दिलेल्या मुदतीत तब्बल २ लाख २२हजार ३५२ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागांच्या तुलनेत दुपटीहून अधिक अर्ज आल्यामूळे प्रवेशासाठी चुरस होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. आरटीई प्रवेशाची लॉटरी दुपारी तीन वाजता काढण्यात येणार आहे.या लॉटरीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.