भारतात भविष्यातील क्वांटम कम्प्युटिंग वर्कफोर्स विकसित करण्यासाठी Microsoft चा नवा प्रोग्रॅम

२४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२० या कालावधीत हा प्रशिक्षण कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमाद्वारे राबवण्यात येणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट क्यू# आणि क्वांटम डेव्हलपमेंट किटचा वापर करून प्रॅक्टिकल कोडिंगचाही यात समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतातील शिक्षक-अभ्यासकांच्या समुदायात क्वांटम कम्प्युटिंग कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट(microsoft) नवा प्रोग्रॅम विकसित करत आहे. जयपूर येथील मालविय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमएनआयटी) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड आयसीटी अकॅडमीज आणि पाटणा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट गॅरेज ‘ट्रेन द ट्रेनर’ या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.

या उपक्रमांतर्गत आयआयटी कानपूर, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी रुरकी, एमएनआयटी जयपूर, एनआयटी पाटणा, आयआयआयटी-जबलपूर आणि एनआयटी वारांगल यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमधील ईअँडआयसीटी अकॅडमीजच्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठ व संस्थांमधील ९०० फॅकल्टीजना त्यांचे क्वांटम फ्युचर विकसित करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

क्वांटम कम्प्युटिंगमध्ये माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी क्वांटम फिजिक्सच्या तत्त्वांचा वापर केला जातो. क्वांटम कम्प्युटर्समुळे आरोग्य, ऊर्जा, पर्यावरणीय व्यवस्था, स्मार्ट मटेरिअल्स आणि त्यापलिकडील अनेक क्षेत्रांमध्ये नवे शोध लावण्यास मदत मिळेल. हे क्वांटम फ्युचर विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझ्यूर क्वांटमच्या माध्यमातून क्लाउडमध्ये आवश्यक त्या क्षमता आणत आहे. अझ्यूर क्वांटम ही डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट व त्यांच्या भागीदारांचे क्वांटम सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि सोल्युशन्सचा वापर करून देणारी ओपन क्लाउड इकोसिस्टिम आहे. अझ्यूर या विश्वासार्ह, व्याप्ती वाढवता येण्यासारख्या आणि सुरक्षित व्यासपीठावर हे विकसित करण्यात आले असून मायक्रोसॉफ्टच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या क्लाउड फ्युचरशी ते सातत्याने ताळमेळ साधत राहील. याखेरीज ओपन सोर्स क्वांटम डेव्हलपमेंट किट आणि क्यू# प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा वापर करून, क्लासिकल हार्डवेअरवर चालणाऱ्या क्वांटम इन्स्पायर्ड सॉल्वर्सच्या माध्यमातून आज परिणाम करण्याची यात क्षमता आहे.

पुढील पिढ्यांना आवश्यक असलेले पुढील पातळीवरील तंत्रज्ञानात्मक कौशल्य शिकवणे शिक्षक-अभ्यासकांना शक्य व्हावे, यासाठी त्यांच्यातील कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (मेटी) यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला ईअँडआयसीटी अकॅडमीजच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा क्वांटम ट्रेनिंग प्रोग्रॅम पाठबळ देणारा आहे. क्वांटम इन्फर्मेशनची ओळख, सुपरपोझिशन आणि एंटॅंगलमेंट यांसारखे क्वांटम कन्सेप्ट्स, क्यूबिट्स आणि क्वांटम गेट्सचा वापर करूनमाहितीवर प्रक्रिया, तसेच क्वांटम मशिन लर्निंग आणि क्वांटम प्रोग्रॅमिंगची ओळख यांचा यात समावेश आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि एंटरप्राइज+डिव्हाइसेस इंडियाचे कॉर्पोरेट व्हाइस प्रेसिडेंट राजीव कुमार म्हणाले, “विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि कम्प्युटिंग (स्टेम+सी) वर्कफोर्स, तसेच तंत्रज्ञानाची क्षमता असलेले नागरिक यासाठी भारताची जगभरात ओळख आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतात कल्पक शोधांना वाव मिळून जगाच्या या भागात आयटी उद्योगाच्या भविष्याला दिशा देण्याची क्षमता असलेले क्वांटममधील कौशल्य व्यापक प्रमाणावर विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना गॅरेज इंडियाच्या संचालक आणि आयईईई क्वांटम एसआयजीच्या चेअर श्रीमती रीना दयाळ म्हणाल्या,“जगाला आज भेडसावत असलेले काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता क्वांटम कम्प्युटिंगमध्ये आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील संस्थांमध्ये व्यापक असा क्वांटम लर्निंग अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी येथील शिक्षक-अभ्यासकांना आवश्यक ते ज्ञान मिळवून देणे आणि देशातील काही हुशार मंडळींमध्ये ही कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

२४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२० या कालावधीत हा प्रशिक्षण कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमाद्वारे राबवण्यात येणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट क्यू# आणि क्वांटम डेव्हलपमेंट किटचा वापर करून प्रॅक्टिकल कोडिंगचाही यात समावेश आहे.

या सहयोगाबाबत एमएनआयटी जयपूरचे संचालक प्रो. उदयकुमार आर. यारागती म्हणाले, “विद्यार्थ्यांना अद्ययावत असे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध असून मायक्रोसॉफ्टसमवेतच्या या सहयोगामुळे आमच्या फॅकल्टी सदस्यांना क्वांटम कम्प्युटिंगच्या विविध कंगोऱ्यांचा शोध घेण्यास प्रोत्साहन मिळेल.”