विद्यार्थ्यांच्या पैशांची अलिशान गाडी घेणाऱ्या कुलगुरूंना प्रहार विद्यार्थी संघटना देणार ‘खेळण्यातली गाडी भेट’

ही चौकशी करण्यामागील कारण असे की, व्यवस्थापन आणि माइनॉरिटी प्रवेशाबाबत (Minority Admissions) पारदर्शकता दिसून येत नाही. माइनॉरिटी कोटयात (Minority Quota) प्रवेश (Admissions) घेतलेले विद्यार्थी हे दर्जा प्राप्त असलेल्या अल्पसंख्याक धर्माचे किंवा भाषेचे भरावे लागतात आणि त्यानंतर इतर अल्पसंख्याक धर्म व अल्पसंख्याक भाषेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागतात असा शासन निर्णय आहे.

  • आज करणार मुंबई विद्यापीठात गाडी भेट आंदोलन
  • झेवियर्स महाविद्यालय ते मुंबई विद्यापीठ पर्यंत काढणार मोर्चा
  • जयहिंद आणि झेवियर्स महाविद्यालयातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या चौकशी आणि ऑडिट करण्याची प्रहारची मागणी

मुंबई : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना (Minority students) सरकारी कोट्यातून प्रवेश न देता अन्य विद्यार्थ्यांना त्या जागेवर प्रवेश देण्याचा धक्कादायक प्रताप झेवियर्स आणि जयहिंद महविद्यालायाच्या व्यस्थापनाने (Xaviers and Jaihind College Managment) केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही महाविद्यालयातील व्यवस्थापन कोटयाची (Management Quota) आणि अल्पसंख्याक (माइनॉरिटी) कोटयाची (Minority Quota) चौकशी (inquiry) करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने (Prahar Vidyarthi Sanghatna) केली आहे.

ही चौकशी करण्यामागील कारण असे की, व्यवस्थापन आणि माइनॉरिटी प्रवेशाबाबत (Minority Admissions) पारदर्शकता दिसून येत नाही. माइनॉरिटी कोटयात (Minority Quota) प्रवेश (Admissions) घेतलेले विद्यार्थी हे दर्जा प्राप्त असलेल्या अल्पसंख्याक धर्माचे किंवा भाषेचे भरावे लागतात आणि त्यानंतर इतर अल्पसंख्याक धर्म व अल्पसंख्याक भाषेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागतात असा शासन निर्णय आहे. यासाठी तीन वर्तमान पत्रात रिक्त जागेची माहिती सुद्धा प्रसिद्ध करावी लागते अशी कोणतीही प्रसिद्धी न करता या दोन्ही महाविद्यालयांनी व इतर अल्पसंख्याक महाविद्यालयांनी हे प्रवेश दिले आहेत.

रिक्त जागेबरोबर प्रवेश रदद् केलेल्या विदयार्थ्यांची माहितीही महाविद्यालये वेबसाइट वर प्रदर्शित करीत नाहीत.१५%व्यवस्थापन (Management) कोटा गुपचुप पद्धतीने या दोन्ही कॉलेज मध्ये भरला जातो. व्यवस्थापन कोटयासाठी प्रवेश फॉर्म भरण्याची सुरुवात ते अंतिम तारीख असे कोणतेही वेळापत्रक नाही व प्रवेश फॉर्मही उपलब्ध करुन दिले नाहीत आणि विशेष म्हणजे मेरिट लिस्ट ही वेबसाइट वर प्रदर्शित केली नाही.

तेव्हा या व्यवस्थापन कोटयात पैशाचे व्यवहार होत असल्याचे दाट शक्यता आहे असा आरोप प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी  केला आहे. तेव्हा या दोन्ही महाविद्यालयांची चौकशी व्हावी अशी मागणीही प्रहार विद्यार्थी संघटनेने उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात केली आहे.

सेल्फ फायनान्सिंग कोर्सेसला नियमित आणि पात्रताधारक शिक्षक नाहीत परंतु विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेतले जाते मात्र शिक्षकांना UGC व शासनाच्या नियमाप्रमाने वेतन दिल्या जात नाही ही एकप्रकारे विद्यार्थ्यांची व शिक्षकांची दोघांची फसवणूक ही दोन्ही महाविद्यालये करीत आहेत तेव्हा नियमित व पात्रता धारक शिक्षक नसलेल्या अभ्यासक्रमांना दरवर्षी बेकायदेशीरित्या UGC,विद्यापीठ आणि शासनाच्या नियमांना डावलून उच्च शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई मान्यता देत असल्याचाही आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस अजय तापकीर यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी पैसे नाहीत म्हणून नेहमी रडणारे विद्यापीठ कुलगुरु यांच्या अलिशान गाडीवर ६० लाख खर्च कसा केला आणि कुठून आला असा प्रश्न उपस्थित झाला असून विद्यार्थ्यांचे पैसे असे कुलगुरुंच्या सुखवस्तु साठी न वापरता विद्यार्थ्यांसाठी वापरावे, कुलगुरुंनी गाडीचे पैसे विद्यापीठाच्या तिजोरीत परत करावेत अशी मागणी करीत कुलगुरु यांचा निशेध म्हणून खेळण्यातली गाडी भेट देण्याचे आंदोलन घेणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.