SPPU
SPPU

आज (२२ ऑगस्ट) रोजी होणारी परीक्षा रद्द करत ५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढ करण्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

    पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा (Exam)  पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. नियमानुसार आज (२२ ऑगस्ट) रोजी होणारी परीक्षा रद्द करत ५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज (online Application) स्वीकारण्याची मुदत वाढ करण्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

    पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणेच सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत परीक्षा ऑनलाईन होणार होती. लॉगइन केल्यापासून दोन तासाचा अवधी पेपर सोडवण्यासाठी दिला दिला होता. याचाप्रमाणे ५ सप्टेंबरलाही हेच वेळापत्रक राहण्याची शक्यता आहे.

    नेट, सेट, गेट, सीएसआयआर, आयसीएआर, डीबीटी आणि परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी सवलत देण्यात आली होती. या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये शुल्क असेल तर राखीव प्रवर्गासाठी ७५०रुपये शुल्क आकारण्यात आले. तर, जे उमेदवार थेट मुलाखतीसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८०० रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.