varsha gaikwad

कोरोनामुळे राज्यातील संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. दिवाळी नोव्हेंबरच्या १३ ते १६ दरम्यान आहे. तोपर्यंत ऑनलाईन माध्यातूनच शिकवणी सुरु राहणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात प्रत्यक्ष शाळा (Schools ) सुरु करण्याच्या निर्णय झालेला नाही आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाची सुरुवात अद्याप करण्यात आली नाही. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा (school reopen date)school reopen date निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister)  यांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे राज्यातील संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. दिवाळी नोव्हेंबरच्या १३ ते १६ दरम्यान आहे. तोपर्यंत ऑनलाईन माध्यातूनच शिकवणी सुरु राहणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून ९वी ते १२वीच्या विद्यार्ध्यांसाठी प्रत्यक्ष शाळा उघडण्याची परवानगी दिली होती. परंतु अभ्यासातील अडचण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे असे सांगण्यात आले होते. मात्र आता राज्य सरकारच्या आदेशामुळे शाळा नोव्हेंबरपर्यंत सुरु होण्याचे संकेत दिसत आहेत. शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाटी शिक्षण विभागाची ११ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाची परिस्थिमुळे शाळा दिवाळी नंतर सुरु करण्याच्या निर्णयावर एकमत झाले.