मुंबईतील आकाश इन्स्टिट्यूटच्या सहा विद्यार्थ्यांनी २०२१ मध्ये ९९ टक्के व त्याहून अधिक टक्के मिळवले

नॅशनल टेस्टिंगने काही काळापूर्वीच निकाल जाहीर केला होता. यावर्षी होणाऱ्या अभियांत्रिकीसाठीच्या चार प्रवेश परीक्षांपैकी ही पहिली परीक्षा होती.

  • जेईई मेन्स २०२१ चे फेब्रुवारी सत्र

मुंबई : मुंबईमधील आकाश इन्स्टिट्यूटच्या सहा विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स २०२१ परीक्षेच्या फेब्रुवारीच्या सत्रात ९९ टक्के आणि त्याहून अधिक प्रभावी गुणांसह शहराला आणि संस्थेला गौरवान्वित केले आहे. रोहन आनंद नाफडे यांनी ९९.९६ आदित्य मंडल, ९९.८२ मयंक झा ९९.६०, रजत बलराज ९९.४४, ओम देसाई ९९.३१ आणि अथर्व व्ही अपशिंगे यांनी ९९.२५ टक्के गुण नोंदवले.

नॅशनल टेस्टिंगने काही काळापूर्वीच निकाल जाहीर केला होता. यावर्षी होणाऱ्या अभियांत्रिकीसाठीच्या चार प्रवेश परीक्षांपैकी ही पहिली परीक्षा होती.

विद्यार्थ्यांचे या प्रभावी यशाबद्दल अभिनंदन करताना आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे (एईएसएल) व्यवस्थापकीय संचालक चौधरी म्हणाले, “जेईई मेन्सच्या २०२१ प्रवेश परीक्षेच्या पहिल्या सत्रामध्ये मुंबईतील आमच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली ही आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. याचे श्रेय आमच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीच्या, त्यांच्या पालकांनी दिलेल्या पाठिंब्याला आणि त्यांच्या संपूर्ण प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी आमच्या गुणवत्ता चाचणीची तयारी उद्योगात प्रख्यात आहे. भविष्यातील प्रयत्नांसाठी मी त्यांच्या शुभेच्छा देतो.”

विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय आकाश मधील आयआयटी-जेईई प्रशिक्षकांनी जगातील सर्वात कठीण मानल्या जाणार्‍या परीक्षेसाठी दिलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षण आणि कठोर परिश्रमास दिले. एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स परीक्षा लागू आहे.

देशभरातून ६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेन्ससाठी नोंदणी केली आहे.