SSC Result 2021 : दहावीचा निकाल ९९.९५ टक्के ; यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल

यंदा विद्यार्थ्यांचा रिझल्ट पाहता गुणांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची पास होण्याची सरासरी देखील मोठी आहे.कोकण पाठोपाठ अमरावती विभागाचा निकाल ९९.९८ इतका लागला. त्यानंतर पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर विभागाचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला.

  महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकाल जाहीर झाला असून यंदा ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही कोकण विभागाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. दरवर्षी कोकण विभाग अव्वल असतो. यंदाही कोकणाने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

  दरवर्षी कोकणच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाअंतर्गत येणाऱ्या नऊ विभागांमध्ये कोकण विभाग अव्वल आहे.

  कोकणाने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड
  यंदा कोकणचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोकण विभागात नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३१, १६८ इतकी होती. हे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.२०१६ साली कोकणची टक्केवारी ९६.५६टक्के, २०१७ साली ९६.१८ टक्के, २०१८ साली ९६ टक्के, २०१९ साली ८८.३८ टक्के आणि मागच्या वर्षी २०२० साली ९८.७७ टक्के निकाल लागला. कोकण विभागात येणाऱ्या ६४१ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तसेच कोकण विभागात शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २४ इतकी आहे.

  यंदा विद्यार्थ्यांचा रिझल्ट पाहता गुणांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची पास होण्याची सरासरी देखील मोठी आहे.कोकण पाठोपाठ अमरावती विभागाचा निकाल ९९.९८ इतका लागला. त्यानंतर पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर विभागाचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के इतका तर नागपूरचा निकाल ९९.८४ टक्के इतका लागला.

  पूर्वी कोकण विभाग कोल्हापूर विभागात अंतर्भूत होता, तो नंतर स्वतंत्र करण्यात आला. कोकण विभागातील विद्यार्थी संख्या काही हजारांमध्ये असते आणि यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारीही अधिक असते.

  विभागिय मंडळ निहाय निकाल
  पुणे : ९९.६५
  नागपूर :९९.८४
  औरंगाबाद :९९.९६
  मुंबई :९९.९६
  कोल्हापूर :९९.९२
  अमरावती :९९.९८
  नाशिक : ९९.९६
  लातूर :९९.९६
  कोकण :१००

  परीक्षेसाठी बसलेले
  विद्यार्थी : ९,०९,९३१
  विद्यार्थिंनी : ७,४८,६९३
  एकूण : १६,५८,६२४

  निकाल पाहण्यासाठी लिंक : result.mh-ssc.ac.in
  शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in