-प्रा. सुहास पटवर्धन, बदलापूर (ठाणे)

शाळा  कॉलेज  मधून  इंग्रजी  विषयाचे   अध्यापन  करताना  एक  प्रश्न हमखास  सर्वांकडून  नेहमी  विचारला  जातो   ”  सर ,  इंग्रजीचा  आम्हाला  प्रॉब्लेम  नाही.  पण  स्पेलिंग  पाठ  करायचे  म्हटलं  की  वाट  लागते. म्हणून आम्ही  इंग्रजीला  घाबरतो. “

स्पेलिंग  !  स्पेलिंग  !!   स्पेलिंग  !!   स्पेलिंग चे  भूत  मुलांच्या  मानेवरून  उतरणार  कसं  ?   त्याचं  उत्तर  हेच  की भूत  नावाच्या  गोष्टीचा  आपण  उगाचच  बाऊ करतो  तसचं  स्पेल्लीगच्या  बाबतीत होत  असतं. मुळात    स्पेलिंग  ही  पाठ  करण्याची  गोष्ट  आहे  असं  समजणे  हाच  खरा  प्रॉब्लेम  आहे. वस्तुस्थिती   अशी  आहे की स्पेलिग ही पाठ  करायची  गोष्ट  नसून  ती  पाहण्याची  गोष्ट  आहे. तुम्ही    म्हणाल , नाटक ,सिनेमा ,क्रिकेट  या गोष्टी  पाहण्याच्या  आहेत हे खरे.   आणि   स्पेलिंग  पण  ? स्पेलिंग  म्हणजे  शब्द  बरोबर ,योग्य रीतीने  लिहिण्याची  पद्धत. स्पेलिंग  शब्द  spelling   असा  लिहिला म्हणजे स्पेलिंग बरोबर असे आपण म्हणतो.  कोणत्याही  भाषेचे  ज्ञान  ८०  % हे ऐकण्याने  होते तर  २०  % वाचनातून होते  असं म्हटलं जातं . एखादा  शब्द  आपण   ऐकलेला  असला  की  तो शब्द  आपण  संभाषणात वापरतो. आपण   इलेक्शन , कमिटी ,इंटरेस्टिंग  असे  अनेक कानावर  पडलेले  परिचित  शब्द सहज  म्हणत  असलो  तरी   तेच  शब्द  लिहायची  वेळ  आली की आपली  तारांबळ  उडते. फजिती  होते. असे का  ?  तर  ते शब्द  आपल्या  नजरेखालून  क्वचितच  गेलेले असतात.वेगळ्या  शब्दात  बोलायचे  तर  ते शब्द  आपण  फारसे  पाहिलेले  नसतात. म्हणजेच   हे  शब्द  आपल्या  वाचनात आलेले नसतात. म्हणजेच  आपले  जेव्ह्ढे  वाचन  जास्त  तेव्हढे  आपले   शब्दभांडार  मोठे. त्या  शब्दभांडारात  स्पेलिंगचा  समावेश आलाच.

पाठ्यपुस्तकातील  धडे  किंवा  कविता  अगदी  पहिल्या  ओळीपासून   काळजीपुर्वक  न  वाचल्याने कित्येक  शब्द  नजरेखालून जात नाहीत.आपण डोक्याला  जास्त ताप  नको  म्हणून  धड्याखालच्या  , कवितेखालच्या  प्रश्नांचे  महत्वाचे\ (  important )  अथवा  अत्यंत  महत्वाचे  (   very  important  )  असे  वर्गीकरण  करतो. हेतू हाच  की कमी  श्रमात  जास्त मोबदला म्हणजे वाचन  कमी  करून  मार्क्स  मात्र  भरपूर  मिळायला  पाहिजेत.काही वर्षापूर्वीच्या  अकरावीच्या  धड्यात  खुशवंत  सिंग यांचा Taking   Studies  Seriously   असा  धडा होता. त्या धड्यातील  एक  वाक्य  सर्वानीच  मुद्द्दाम लक्षात  ठेवण्यासारखे आहे.

   ”  There  is  no  shortcut  to  success.”म्हणजे यशाकडे  जाण्यासाठी  जवळचा गुळगुळीत  रस्ता  नसतो.एखाद्या  मित्राला  किंवा  मैत्रिणीला  आपण  वारंवार  भेटतो.तेव्हा  तो चेहरा  आपल्या  चांगला  लक्षात  राहतो. अगदी  लांबून पाहिलं  तरी  आपण त्या व्यक्तिला  ओळखतो. आणि  नावांनी हाक  मारतो. पण बऱ्याच  दिवसात  आपण जर  एखाद्याला  पाहिलं नसेल   तर त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत नाही किंवा त्याचे नांव  आठवत  नाही.त्याला ओळखणे  कठिण  जाते. आपल्या  मेंदूत एक प्रतिमा  (  image )  निर्माण  होत असते .ती साठविली जाते.व  पुन्हा त्यासारखीच  एखादी प्रतिमा  डोळ्यांसमोर  आली   की  मेंदूत संग्रहित  केलेल्या  (  stored  & filed )  पूर्वीच्याप्रतिमेशी  त्याची  तुलना  करून  पडताळून  पाहीली  जाते .(  compared  &  verified  ).

धडा  किंवा  कविता  समजून  घेण्यासाठी  गाईडची  जरूर  मदत  घ्या ..पण    तेवढ्यापुरतीच..  गाईड  वाचले म्हणजे  आता पाठ्यपुस्तक  वाचायची  गरज  नाही असा गैरसमज  करून घेऊ नका.  फक्त  गाईड मध्ये  असलेले  प्रश्नच विचारले जातील असं  समजु  नये. पाठ्यपुस्तक  काळजीपूर्वक  वाचलेले  असले म्हणजे  आत्मविश्वासाने  परीक्षेला  सामोरे  जातायेते.. केवळ वाचन केलं म्हणजे  भरपूर  अभ्यास  झाला असं नसतं. त्यासाठी  आपलं  लिखाणही  असायला  हवं. एकदा लिहिणे म्हणजे चार वेळा वाचण्यासारखे  आहे.त्यामुळे  आपली  लिखाणाची  गती  वाढते. स्पेलिंग  बरोबर येतं.  ठरलेल्या  वेळेत  सर्व  प्रश्नांची  उत्तरे समर्पकपणे  लिहिता  येतात. वाचाल तर वाचाल  हे जसे खरे   तसेच  लिहाल  तर  वाचाल हे देखील  तितकेच खरे.

इंग्रजीचा प्रत्येक धडा किंवा  कविता अगदी  पहिल्या  ओळीपासून  शेवटच्या  ओळीपर्यंत  काळजीपूर्वक  वाचणे  आवश्यक आहे.त्यामुळे  इंग्रजीत वाक्यरचना  कशी केली  आहे , कोणत्या  संदर्भात  कोणता   शब्द अचूक  वापरला  जातो  याचे  ज्ञान होते.आणि  सर्वात  म्हहत्वाचे  म्हणजे  त्या  शब्दाचे स्पेलिंग    आपोआप  पाठ   होते. पुन्हा  पुन्हा वाचणे  (  Read  again & again ) .  वाचलेले   लक्षात ठेवणे  (   Remember )   आणि  वाचलेले  लिहून काढणे  (  Reproduce ) ही  वामनराव पै  यांनी  सुचविलेली  अभ्यासाची   त्रि:सूत्री  लक्षात ठेवून  वाचन व लिखाण  केलं  तर  खऱ्या  अर्थाने आपला अभ्यास  झाला असे म्हणता येईल.