येत्या ऑक्‍टोबरमध्ये “टीईटी’ परीक्षा ; राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी

राज्यात १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान 'टीईटी' घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्‍त तथा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबतच्या अधिसूचना पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे.

    पुणे : शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता ऑक्‍टोबरमध्ये ही परीक्षा होणार आहे.

    राज्यात सहावेळा ‘टीईटी’ घेण्यात आल्या असून त्यात ८६ हजार २९८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. १९ जानेवारी २०२० नंतर एकही परीक्षा घेण्यात आली नाही. राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये परीक्षा घेण्याची परवानगी मागितली होती. शासनाने एप्रिलमध्ये मान्यतेचे पत्र पाठविले. तसेच. मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे या परीक्षा घेणे शक्‍य झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा ९ जुलै रोजी परीक्षा घेण्याबाबत परवानगीचे पत्र शासनाला पाठविले होते. त्यावर शासनाने नुकताच निर्णय कळविला आहे.

    ऑफलाईन होणार परीक्षा
    राज्यात १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘टीईटी’ घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्‍त तथा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबतच्या अधिसूचना पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे.