जेईई ऍडव्हान्स आणि जेईई मेन्ससाठी आयआयटी २० संकेतस्थळ उपयोगी ठरेल

– स्टुडंट्स मंत्रनाने विद्यार्थ्यांसाठी तयार केले वेब बेस्ड अँप्लिकेशन
औरंगाबाद: जेईई ऍडव्हान्स चा निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. प्रामुख्याने समुपदेशन कोण करेल कॉलेजची निवड कशी करावी, ब्रँच कोणती असावी आणि कट ऑफ नेमका काय असतो असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्यासाठी आयआयटी २०२० हे संकेतस्थळ वरदान ठरणार आहे, असे मत स्टुडंट्स मंत्रनाचे सावन चुडीवाल यांनी सोमवारी (ता.५) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

चुडीवाल यांनी सांगितले की, या संकेतस्थळामुळे तुम्हाला मिळालेल्या गुणांनुसार भारतभर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो हे समजणे सोपे होईल. या वेब बेस्ड अँप्लिकेशनचे विद्यार्थ्यांना पाच महत्वाचे फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे महाविद्यालय निहाय, कोर्स निहाय जेईई ऍडव्हान्स प्रत्येक आयआयटीयन्स त्यांचा कट ऑफ समजू शकेल. तिसरा फायदा म्हणजे एनआयटी, ट्रिपल आय टी, जीएफटीआय’एस करिता महाविद्यालय निहाय आणि कोर्स निहाय जेईई मेन्सचे विद्यार्थी रँकिंग बघू शकता. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक ब्रँच आरक्षणनिहाय आलेख पद्धतीने बघू शकतो. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्व महाविद्यालयांची शाखेनिहाय सविस्तरपणे माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

ही सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने बघता येईल. सर्वप्रथम रँक, त्यानंतर अनुक्रमे कॅटेगरी, जेंडर आणि राउंड भरल्यास तुम्हाला एका क्लिकवर तुमच्या कॉलेजची माहिती अगदी काही सेकंदात विस्तृतपणे मिळेल.