झी एन्टरटेन्मेंटच्या माइंड वॉर्सने पटकावले इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स सर्टिफिकेशन

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनचे (lockdown) प्रतिबंध लागू झाल्यानंतर देशभरातील शाळांचे दरवाजे बंद झाले (Schools Closed) आणि त्यांची उणीव भरून काढण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग (Use Of Technology) आणि समज पाहता-पाहता प्रचंड वाढली. माइंड वॉर्सच्या टीमने या संधीचा उपयोग करून आपल्या सर्व सोशल मीडिया मंचांवरून (Social Media Platform) लाईव्ह क्विझ योजण्यास सुरुवात केली आणि हा उपक्रम थोड्याच काळात खूप लोकप्रिय झाला.

  • एक वर्षात देशभरात सर्वाधिक ऑनलाइन लाईव्ह क्विझ आयोजित केली

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठीचा (School Students) भारतातील सर्वात मोठा ज्ञान मंच, झी एन्टरटेन्मेंटच्या माइंड वॉर्सने (Mind Wars of Zee Entertainment) आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. भारतातील रेकॉर्ड्सचा क्युरेटर आणि पालक असलेल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने (India Books Of Records) माइंड वॉर्सच्या ऑनलाइन लाईव्ह क्विझिंगला (Live quizzing) एका कॅलेंडर वर्षात देशभरात योजण्यात आलेला सर्वात मोठा क्विझिंग उपक्रम म्हणून मान्यता व प्रमाणपत्र बहाल केले (Recognition and certificate awarded) आहे.

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनचे (lockdown) प्रतिबंध लागू झाल्यानंतर देशभरातील शाळांचे दरवाजे बंद झाले (Schools Closed) आणि त्यांची उणीव भरून काढण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग (Use Of Technology) आणि समज पाहता-पाहता प्रचंड वाढली. माइंड वॉर्सच्या टीमने या संधीचा उपयोग करून आपल्या सर्व सोशल मीडिया मंचांवरून (Social Media Platform) लाईव्ह क्विझ योजण्यास सुरुवात केली आणि हा उपक्रम थोड्याच काळात खूप लोकप्रिय झाला.

हे प्रमाणपत्र घेताना झी एन्टरटेन्मेंट एंटरप्राइझेस लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश कृ. बंसल म्हणाले, “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता आणि सन्मान प्राप्त करताना माइंड वॉर्समध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे. हे प्रमाणपत्र म्हणजे माइंड वॉर्सचा प्रत्येक सदस्य आणि साहाय्यक एजन्सी यांच्या द्वारे राबवण्यात आणि व्यवस्थापित करण्यात आलेल्या या विशाल उपक्रमाला मिळालेली दाद आहे. आमच्या टीम्सना विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान-आधारित पर्याय प्रदान करून त्यांचा समय सत्कारणी लावण्यास मदत करण्यासाठी या मंचाचा उपयोग केला आणि ‘मेक इंडिया स्मार्टर’ हे माइंड वॉर्सचे ब्रीदवाक्य सार्थ केले.

हे प्रमाणपत्र देताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकृत निर्णायक विश्वदीप रॉय चौधरी म्हणाले, “आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स येथे देशभरातील आगळ्यावेगळ्या उपक्रमांना मान्यता देऊन त्यांना जगापुढे आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. लॉकडाउनच्या प्रतिबंधांमुळे शाळा बंद झाल्यानंतर माइंड वॉर्स टीमचा हा ऑनलाइन उपक्रम प्रकर्षाने नजरेत भरणारा होता तसेच एका बालकाच्या संगोपनासाठी सकारात्मकरित्या वापरल्यास सोशल मीडिया किती महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, याची साक्ष पटवणारा होता.”

आपल्या प्रकाशनाच्या १५ वर्षांमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स नियमितपणे प्रकाशित झाले आहे. त्यांच्या बोर्ड सदस्यांमध्ये सात राष्ट्रांच्या (व्हिएतनाम, मलेशिया, USA, नेपाळ, इंडोनेशिया, बांग्लादेश आणि थायलंड) रेकॉर्ड बुक्सच्या प्रमुख संपादकांची उत्कृष्ट टीम आहे.

५० निर्णयकांच्या अनुभवी टीमसह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स सुनिश्चित करते की, विक्रम स्थापित करणारे सर्व लोक ‘इंटरनॅशनल प्रोटोकॉल फॉर न्यू रेकॉर्ड्स (IPNR) दिशानिर्देशांनुसार ठरवलेल्या नियमांचे पालन करून आपले लक्ष्य साध्य करतील. ही प्रत्येक सिद्धी तपासण्यासाठी, त्यावरील प्रक्रियेसाठी आणि त्याच्या खरेपणाची खात्री करण्यासाठी ४५ सदस्यांची संपादकांची टीम निरंतर आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता काम करत असते, जेणेकरून पात्र विक्रम निवडता यावा.

झी एन्टरटेन्मेंट एंटरप्राइझेस लिमिटेड (ZEEL) चा अभिनव उपक्रम असलेल्या माइंड वॉर्सचे आज १.८ मिलियनपेक्षा जास्त सब्स्क्राईबर्स असून देशभरातील २० मिलियनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मंच पोहोचलेला आहे. अशा प्रकारे हा भारतातील सर्वात मोठा आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा ज्ञान वर्धन कार्यक्रम आहे.