4.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कंप्युटर सायन्स शिक्षण आणि करिअर शोधाची संधी देऊन ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअरचे भारतात एक वर्ष पूर्ण; शिष्यवृत्तीसाठी ‘येथे’ करा अर्ज

इयत्ता 3 री ते 12 वी मधील हे विद्यार्थी प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील आहेत आणि त्यांच्याकडे कंप्युटर सायन्सचा अभ्यास करण्यासाठी किंवा तंत्रज्ञान उद्योगात अस्तित्वात असलेल्या करिअर बद्दल संधी शोधण्यासाठी संसाधने नाहीत.

  • कंपनीने 2023 AFE शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरू केली
  • प्रती विद्यार्थी 1.6 लाख आर्थिक सहाय्य दिले जात आहे
  • कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 500 मुलींना दिले जाईल

नवी दिल्ली : ॲमेझॉन फ्युचर इंजिनीअर (AFE) या ॲमेझॉन (Amazon) द्वारे महत्वपूर्ण जागतिक कंप्युटर सायन्स शिक्षण कार्यक्रमाला भारतात एक वर्ष पूर्ण झाले आहे (The Global Computer Science Education Program has completed one year in India). ॲमेझॉन ने 11 राज्यांमधील 3000 हून अधिक सरकारी शाळांमधील 4.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना चर्चात्मक डिजिटल आणि वैयक्तिक शिक्षण हस्तक्षेपांद्वारे कंप्युटर सायन्स शोध घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

इयत्ता 3 री ते 12 वी मधील हे विद्यार्थी प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील आहेत आणि त्यांच्याकडे कंप्युटर सायन्सचा अभ्यास करण्यासाठी किंवा तंत्रज्ञान उद्योगात अस्तित्वात असलेल्या करिअर बद्दल संधी शोधण्यासाठी संसाधने नाहीत. पहिल्या वर्षात, कार्यक्रमाने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 200 मुलींना कंप्युटर सायन्स शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीसह पाठिंबा दिला.

Amazon च्या पाठिंब्याने, विद्यार्थी संवादात्मक आणि व्यावहारिक कन्टेंट सह त्यांचा कंप्युटर सायन्स शिकण्याचा प्रवास सुरू करतात जे AFE भागीदार नॉन-प्रॉफीट संस्थांद्वारे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना वितरित केले जाते. AFE ने सुमारे 70 AFE लॅब देखील स्थापित केल्या आहेत जिथे मुले कोड शिकतात आणि रस्पबेरी PIs आणि सेन्सर सारख्या फिजीकल कंप्युटींग कंपोनंट्सचा वापर करून थेट प्रोजेक्ट तयार करतात.

डिजिटल मालमत्तेसह एकत्रित केलेल्या या प्रयोगशाळा शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांना कंप्युटर आणि तंत्रज्ञानाचा प्रयोग करून सर्वांगीण शिक्षण अनुभव देण्यास सक्षम करतात. AFE स्कॉलर्ससाठी, ॲमेझॉन प्रत्येक विद्यार्थ्याला एक यशस्वी टेक्नीकल करिअर तयार करण्यासाठी ॲमेझॉनच्या लोकांकडून मार्गदर्शन आणि बूटकॅम्प स्टाईल कोर्ससह चार वर्षांमध्ये 1.6 लाख रूपये देते.

ॲमेझॉन इन दि कम्युनिटी, CSR इंडिया आणि APAC चे प्रमुख अनिता कुमार म्हणाल्या, “कंप्युटर सायन्स शिक्षण सार्वजनीक करण्याच्या उद्देशाने ॲमेझॉन फ्युचर इंजिनियरची भारतात सुरूवात करण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक मुलामध्ये केवळ तंत्रज्ञानाचे ग्राहक नसून निर्माता बनण्याची क्षमता असेल. AFE ची सुरूवात झाल्यापासून, आम्ही आमच्या भागीदार संस्थांसह, अनेक राज्यांमधील सरकारी शाळांमध्ये कंप्युटर सायन्स शिक्षणाच्या प्रणाली प्रमाणे एकात्मतेला समर्थन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.” पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही कंप्युटर सायन्स शिकण्याचे मार्ग देतो ज्यात स्थानिक भाषांमधील CS च्या वास्तविक जगाच्या अनुप्रयोगावर आधारित चर्चात्मक शिक्षण कन्टेंट, शाळांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम, CS मधील शिक्षकांसाठी अभ्यासक्रम, CS शिकवण्यासाठी अतिरिक्त लोक आणि पायाभूत सुविधांमधील अंतर भरून काढणे यांचा समावेश होतो. या उपक्रमांद्वारे, आम्हाला विश्वास आहे की, एक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञान उद्योग उभारताना, दर्जेदार संगणक विज्ञान शिक्षणाद्वारे आम्ही तरुणांना त्यांचे सर्वोत्तम भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करू शकू,” अनिता म्हणाल्या.

कौशल्य विकास आणि उद्योजकता; आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे माननीय राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर म्हणाले, “कोविड नंतर, जगभरातील डिजिटलायझेशनचा वेगवान दर भारत आणि तरुण भारतीयांना प्रचंड संधी देतो. पंतप्रधान मोदींनी येत्या दशकाची (डिकेड) ची कल्पना भारताचे टेकेड म्हणून केली आहे – जे तरुण भारतीय चालवतील. डिजिटल कौशल्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून – विविध कौशल्य, अपस्किलिंग आणि री-स्किलिंग कार्यक्रमांद्वारे आपल्या नागरिकांना उद्योग-संबंधित कौशल्ये आणि नोकरीच्या संधींसह सक्षम करण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी ॲमेझॉन इंडियाच्या फ्युचर इंजिनिअर प्रोग्रामचे कौतुक करतो, जो आमच्या वंचित विद्यार्थ्यांना सरकारी शाळांद्वारे संबंधित प्रशिक्षण आणि कौशल्ये देतो. हा कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी आणि पंतप्रधान मोदीजींच्या न्यू इंडिया आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या संकल्पनेला बळ देण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.”

ॲमेझॉनने आता 2023 च्या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरू केली आहे. त्याच्या दुसऱ्या वर्षात, शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 असून शिष्यवृत्तीची संख्या आता 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या मुलींनी आधीच केंद्रीय किंवा राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेद्वारे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे आणि एकूण घरगुती वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

भारताव्यतिरिक्त, AFE कार्यक्रम यूएसए, यूके, फ्रान्स आणि कॅनडा मधील अप्रस्तुत समुदायांमधील दहा लाखांहून अधिक मुले आणि तरुण प्रौढांसाठी कंप्युटर सायन्स शिक्षणास समर्थन देत आहे. हा कार्यक्रम शाळांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून सक्षम परिसंस्था निर्माण करण्याच्या बहुआयामी दृष्टिकोनाचा अवलंब करतो.

AFE कम्प्युटर सायन्स एक्सप्लोर अ‍ॅक्टिव्हिटी जसे की ‘अवर-ऑफ-कोड’ आणि ‘ॲमेझॉन सायबर रोबोटिक्स चॅलेंज’ विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्सच्या मूलभूत गोष्टींशी परस्परसंवादी आणि मजेशीर पद्धतीने परिचय करून देते. विद्यार्थ्यांना ‘कोड-ए-थॉन’ सारख्या सखोल कम्प्युटर सायन्स शिकण्याच्या संधीही दिल्या जातात – कोडिंग शिकण्यासाठी प्रकल्प-आधारित संरचित बूट कॅम्प आणि रोबोटिक्स, कम्प्युटर एडेड डिझाइन आणि वेब डिझाइनवरील प्रगत अभ्यासक्रम याच्या सुद्धा संधी दिल्या जातात. AFE ‘कोड-मित्रा’ आणि ‘मेराकी’ सारखे डिजिटल कम्प्युटर सायन्स शिक्षण ॲप्स देखील तयार करत आहे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत, मोबाइल डिव्हाइसवर, इंटरनेटशिवाय संगणक विज्ञान शिकण्यास सक्षम करते. तंत्रज्ञान इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या करिअरची विद्यार्थ्यांना लवकर माहिती सादर करण्यासाठी, Amazon विद्यार्थ्यांना ‘क्लास चॅट्स’ ऑफर करते. ॲमेझॉन कर्मचारी स्वयंसेवक शालेय विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत करण्यासाठी, त्यांच्या करिअरवर चर्चा करून, त्यांच्या प्रवासातून शिकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना केवळ टेक उद्योगातील विविध करिअरच नाही तर तिथे कसे जायचे हे देखील समजून घेण्यास मदत करतात.

AFE शिक्षकांना कम्प्युटर सायन्स अधिक आकर्षक पद्धतीने शिकवण्यासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये निर्माण करण्यास सक्षम करत आहे. हे सुलभ करण्यासाठी, AFE, विविध सरकारी संस्था आणि नॉन-प्रॉफीट संस्थांच्या सहकार्याने, कम्प्युटर सायन्स त्यांच्या वर्गात घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण आणि कोडींग अभ्यासक्रम देते.

अशा एका शिक्षक सत्रामध्ये सहभागी होतांना, पुणे, महराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिके अंतर्गत पिंपळे निलख स्कूल च्या शिक्षीका सुरेखा कुंजीर म्हणाल्या, “याआधी, मला अल्गोरिदम आणि सिक्वेन्सिंग यांसारख्या संकल्पनांची फारशी माहिती नव्हती. या शिक्षक प्रशिक्षण कोर्सने मला या संकल्पना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त कशा आहेत आणि विद्यार्थ्यांना क्रिएटीव पद्धतीने कोडिंग शिकण्यास मदत करू शकतात हे समजून घेण्यासाठी मला एक व्यापक दृष्टीकोन दिलेला आहे. कोड शिकण्याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार आणि डिझाइन विचार विकसित करणे ही कल्पना आहे ज्यावर तंत्रज्ञान उद्योगाने देखील जोर दिला आहे. या शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमामुळे मला कोडच्या या संकल्पना समजून घेण्यात मदत झाली आहे आणि मी याचा माझ्या विषयांमध्ये समावेश करत आहे. कोडिंगबद्दलची माझी भीती आता दूर होत आहे आणि विद्यार्थी देखील या अनुभवाचा आनंद घेत आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत.”

ॲमेझॉन फ्युचर इंजिनीरींग हा कंप्युटर सायन्स शिक्षण कार्यक्रम आहे जो सर्व तरुणांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्यास आणि आपल्या सर्वांसाठी एक चांगले जग तयार करण्याची संधी देतो. ॲमेझॉन फ्यूचर इंजिनियर हा बालपण ते करिअर पर्यंत चालणारा प्रोग्राम असल्यामुळे, तो प्रोग्रामिंगची ऑफर करतो जो प्राथमिक शाळेपासून सुरू होतो आणि माध्यमिक शाळा ते करिअरपर्यंत चालू राहतो. संपूर्णपणे, ॲमेझॉन अशा संस्थांसोबत भागीदारी करते ज्यांचेही ध्येय तेच आहे आणि विद्यार्थ्यांना स्वत: ची अभिव्यक्ती, सामाजिक न्याय, टिकाव आणि अधिकच्या माध्यमातून कंप्युटर सायन्सची समृद्धता शोधण्याची संधी निर्माण करतात.

ॲमेझॉनने 2021 मध्ये भारतात AFE कार्यक्रम सादर केला आणि लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, Pi जॅम फाऊंडेशन, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन, Code.org, शैक्षणिक उपक्रम, पीपुल, द इनोव्हेशन स्टोरी, नवगुरुकुल आणि फाऊंडेशन फॉर एक्सलन्स इत्यादी संस्थांसह अनेक शिक्षण-केंद्रित नॉन-प्रॉफीट संस्थांसोबत विद्यार्थ्यांना शिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी भागीदारी केली आहे. या भागीदारांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे, ॲमेझॉनने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये AFE कार्यक्रम राबविण्यासाठी प्रमुख सरकारी संस्था, धोरण निर्माते, शिक्षक आणि हजारो शाळांच्या व्यवस्थापना संबंधित देखील सहभाग घेतला आहे.