आयडॉलच्या एमएमएस आणि एमसीए प्रवेश परीक्षांच्या अर्जांना २४ सप्टेंबर पासून सुरुवात

    मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूर वमुक्त अध्ययन संस्थेला एअायसीटीई आणि यूजीसीने एमएमएस आणि एमसीए हे दाेन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून २४ सष्टेंबर पासून सुरु हाेत आहेत. हे अर्ज भरण्याची शेअवतची तारीख ३ ऑक्टोबर असणार आहे. तसेच एमएएस आणि एमसीएची प्रवेश परीक्षा रविवार १६ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन सुरु होणार आहे.

    २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई आणि यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु आहे. संबंधित अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई आणि यूजीसीने २ हजार जागांची मान्यता दिली आहे.

    दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २४ सप्टेंबर २०२२ पासून हे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होत असून शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२२ असणार आहे. तर एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा रविवार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑनलाईन होणार आहे. या प्रवेश परीक्षेची सर्व माहिती विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.