cbse board exams date will announce on 31 december by education minister ramesh pokhriyal nishank nrvb
CBSE Board Exam 2021 Date: शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती; या दिवशी करणार बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा

शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना, CBSE 2021 बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता मी त्यांच्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत याबाबतची घोषणा करणार आहे.

CBSE Board Exam 2021 Date: दीर्घ काळापासून बोर्डाच्या परीक्षांबाबत असलेला संभ्रम आता ३१ तारखेला दूर होणार आहे कारण शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की, ३१ डिसेंबरला याबाबतची घोषणा करणार आहेत की, CBSE बोर्डाच्या परीक्षा कधी होणार आहेत.

शिक्षणमंत्री निशंक यांनी या ट्विटनंतर आता काही दिवसांतच लाखो विद्यार्थ्यांना या बाबतची माहिती मिळेल की त्यांच्या बोर्डाच्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना, CBSE 2021 बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता मी त्यांच्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत याबाबतची घोषणा करणार आहे.

कोरोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये दीर्घ काळापासून बंद आहेत. ऑनलाइन क्लासेसच्या माध्यामातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. या दरम्यान काही अंदाज व्यक्त करण्यात येत होते की, केंद्र सरकार ऑनलाइनच परीक्षा घेऊ शकते. मार्च किंवा एप्रिलमध्ये सीबीएसईच्या बोर्ड परीक्षांचे आयोजित करण्यात येतील पण आता शिक्षण मंत्र्यांच्या ट्विटनंतर ३१ डिसेंबरला हे चित्र स्पष्ट होणार आहे.

याआधीच शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांशी बोलताना नमूद केलं होतं की, बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ पर्यंत घेण्यात येणार नाहीत, पण या परीक्षा रद्दही होणार नाहीत. तथापि, आता असं म्हटलं जात आहे की, परीक्षा ऑफलाइनच घेण्यात येणार आहेत, पण कोविडपासून बचाव करायचा असेल तर काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत कोविडपासून बचावासाठीच्या सर्व पद्धती अवलंबण्यात येणार आहेत.