विद्यार्थ्यांना नाहक त्रास व परिक्षेला बसू न देणाऱ्या प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयाला मनविसेचा दणका

या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत त्यांना परीक्षा देण्याची परवानगी महाविद्यालयाने नाकारली होती. कोविड काळात राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून महाविद्यालय प्रशासनाने स्वत:चे जाचक नियम विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून दोन्ही वर्षांचे विद्यार्थी या परीक्षांमध्ये अनुतीर्ण झाले.

  • मुंबई विद्यापीठाच्या नियमांचे केले होते उल्लंघन
  • दोषी प्राध्यापकांवर केली कारवाईची मागणी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) नियमांचे उल्लंघन (Violation Of Rules) करत प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत परीक्षेला बसू न देणाऱ्या प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयाला (Prahladarai Dalmia College Of Commerce, Malad, West) मनविसेने (MNVS) दणका दिला आहे. प्राध्यापकांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा आणि कारवाई करावी अशी मागणी मनविसेतर्फे कुलगुरुंकडे (Vice-Chancellor Of University Of Mumbai)  करण्यात आली आहे.

या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत त्यांना परीक्षा देण्याची परवानगी महाविद्यालयाने नाकारली होती. कोविड काळात राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून महाविद्यालय प्रशासनाने स्वत:चे जाचक नियम विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून दोन्ही वर्षांचे विद्यार्थी या परीक्षांमध्ये अनुतीर्ण झाले.

विद्यार्थ्यांनी त्यांना न्याय मिळावा, या प्रकरणात लक्ष घालावे म्हणून मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे (MNVS President Amit Thackeray) यांची १ महिन्यापूर्वी भेट घेतली होती. मुंबई विद्यापीठाचे मनविसे राज्य प्रमुख संघटक, संतोष गांगुर्डे (MNVS State Chief Organizer, Santosh Gangurde), गोरेगाव मनविसे विभाग अध्यक्ष चीनी गोगी, विद्यापीठ उपाध्यक्ष अभिजीत भोसले यांनी या प्रकरणात लक्ष घालत कॉलेज ऑफ कॉमर्स प्रशासनाला जाब विचारत याचा पाठपुरावा केला होता. महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने वेळप्रसंगी मनविसेने कठोर पावले उचलत आंदोलनाचा बडगाही उगारला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले. महाविद्यालय प्रशासनाने नमते घेत आपली चूक मान्य करत विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.

विद्यार्थ्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी सुद्धा अशा प्रकारचे विद्यापीठाचे नियम न मानता परीक्षेसाठी स्वत:चेच जाचक नियम तयार करणाऱ्या दोषी प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे करण्यात आली आहे.

- संतोष गांगुर्डे, राज्य प्रमुख संघटक, मनविसे