finance department approves increase in salary of teachers on clock hourly basis says higher and technical education minister chandrakant patil nrvb

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ (Remuneration Incriment) करण्यास वित्त विभागाने (Finance Department) मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे (Approved posts) ही सेवानिवृत्ती (Retirement) वा अन्य कारणामुळे रिक्त (Vaccent Posts) आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात (Students Study) खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर (CHB) अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते.

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ (Salary Incriment) करण्यास वित्त विभागाने (Finance Department) मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय :

कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.६२५ वरुन रु.१ हजार प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.७५० वरुन रु. १ हजार प्रति तास.

शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. ७५० वरुन रु.१ हजार प्रति तास.

तंत्र शिक्षण संचालनालय :

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. १ हजार वरुन रु. १ हजार ५०० प्रति तास.

पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. ६०० वरुन रु. १ हजार प्रति तास.

पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. ५०० वरुन रु. ८०० प्रति तास.

कला संचालनालय :

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. ७५० वरुन रु.१ हजार ५०० प्रति तास.

कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. ६२५ वरुन रु.१ हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.