तुमच्या कामाची बातमी! लवकरच इंजिनिअरिंग, टेलिकॉम आणि हेल्थ सेक्टरमध्ये १.२ कोटी नव्या नोकऱ्यांची संधी

बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, इंजिनिअरिंग, टेलिकॉम आणि हेल्थ सेक्टरमध्ये १.२ कोटी नव्या नोकऱ्यांची संधी, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्सची गरज २०२६ पर्यंत दुप्पट होणार

    नवी दिल्ली :  इंजिनिअरिंग, टेलिकॉम आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये पुढच्या पाच वर्षांत १.२ कोटी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या क्षेत्रांत नोकऱ्यांची संधी वर्षाला २५ ते २७ टक्के वाढण्याची शक्यता आहे. हायरिंग फर्म चीमलिज डिजिटलच्या अहवालानुसार, पीएलआयई स्कीम आणि परदेशी गुंतवणूक या दोन्हींमुळे या तीन क्षेत्रांतील कुशल कामगारांना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.

     

    इंजिनिंरिंग, टेलिकॉम आणि हेल्थ सेक्टर ही तिन्ही क्षेत्रे नव्या बदलांतून जात असून, येत्या पाच वर्षांत या तिन्ही क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि जीडीपीसाठी मदत होणार आहे.

    इंजिनिअरिंग – २०२५ पर्यंत जीडीपीत योगदान- २७ टक्के

    २१-२२ मध्ये रोजगार – ३ कोटी

     

    टेलिकॉम – २०२५ पर्यंत जीडीपीतल योगदान – १० टक्के

    २१-२२ मध्ये रोजगार – ४० लाख

    हेल्थ केअर – २०२५पर्यंत जीडीपीत योगदान – २.५ टक्के

    २१-२२ रोजगार- ७५ लाख

     

    तिन्ही क्षेत्रांचा व्यापार ११४ लाख कोटी रुपये

    टेलिकॉम, इंजिनिअरिंग आणि हेल्थ केअर या तिन्ही क्षेत्रांची एकूण बाजारपेठ ही ११४ लाख कोटी रुपये इतकी मोठी आहे. या क्षेत्रात ४.२ कोटींहून अधिक जणांना रोजगार मिळण्याची संधी आहे. यामुळे २०२६ पर्यंत १.२ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. यात ४६ लाख नोकऱ्या या स्पेशलाईझेशनच्या स्वरुपातील असतील.