Great relief to the students MHT-CET will be on the reduced curriculum nrvb

सीईटीच्या प्रश्नांची काठिण्यपातळी जेईई मेन्स आणि नीट परीक्षेप्रमाणे राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही; तसेच संपूर्ण परीक्षा एमसीक्यू प्रश्नांवर परीक्षा होणार आहे.

  • राज्य सीईटी सेलने जाहीर केला परीक्षेचा अभ्यासक्रम

पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटीचा अभ्यासक्रम राज्य सीईटी सेलने जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने कमी केलेल्या अभ्यासक्रमांवर यंदाची सीईटी होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

राज्य सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षांचे अभ्यासक्रम जाहीर करण्यात आले आहेत. यंदाची एमएचटी- सीईटी परीक्षेत २० टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर, तर बारावीच्या ८० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत; तसेच ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानुसार हा २५ टक्के अभ्यासक्रम वगळून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

निगेटिव्ह मार्किंग नाही

सीईटीच्या प्रश्नांची काठिण्यपातळी जेईई मेन्स आणि नीट परीक्षेप्रमाणे राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही; तसेच संपूर्ण परीक्षा एमसीक्यू प्रश्नांवर परीक्षा होणार आहे. पीसीएम गटाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांवर, तर पीसीबी गटाची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली.