IIT मद्रासने जिंकली E.D.G.E कॅम्पस प्रोग्रामची सहावी आवृत्ती; ISB हैद्राबाद आणि FMS दिल्ली ठरले उपविजेते

ISB हैदराबादची टीम पर्पल ही ऑनलाईन सह ऑफलाईन स्टोअर मध्ये ग्राहकांचा प्रवास एकत्रित करणारा D2C बिजनेस साठीच्या त्यांच्या सोल्युशनसह दुसरी ठरली. त्यांना २००,००० रोख आणि सॅमसंग सोबत प्री-प्लेसमेंट मुलाखत असे पारितोषिक मिळाले.

  • सॅमसंग E.D.G.E. च्या सहाव्या आवृत्तीमध्ये भारतामधील सर्वोत्कृष्ठ बी-स्कूल
  • इंजिनीरींग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट यांसह २० अग्रेसर शैक्षणिक संस्थांमधील ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा होता सहभाग

चेन्नई : भारतातील सर्वात मोठा आणि विश्वसनीय कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने पॅन-इंडिया कॅम्पस प्रोग्राममध्ये सहभागी २० सर्वोत्कृष्ट संस्थांमधील ५००० हून अधिक विद्यार्थ्यांसह E.D.G.E. च्या सहाव्या आवृत्तीचा निकाल दिला.

IIT मद्रास मधून टीम AKR मेंडर्स चे राघव तलवार, अभिनव नहाटा आणि कुश गनात्रा यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. AI recommendation, AR/VR, IoT & QR कोड इंटीग्रेशन चा वापर करून डायरेक्ट टू कंज्युमर (D2C) बिजनेस संदर्भात यूजर प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याला अनुकूल करण्यासाठी त्यांच्या नावीण्यपूर्ण सोल्युशनने परीक्षकांना आकर्षित केले आणि ४००,००० चे रोख पारीतोषिक आणि सॅमसंगचा फ्लॅगशीप स्मार्टफोन जिंकला.

ISB हैदराबादची टीम पर्पल ही ऑनलाईन सह ऑफलाईन स्टोअर मध्ये ग्राहकांचा प्रवास एकत्रित करणारा D2C बिजनेस साठीच्या त्यांच्या सोल्युशनसह दुसरी ठरली. त्यांना २००,००० रोख आणि सॅमसंग सोबत प्री-प्लेसमेंट मुलाखत असे पारितोषिक मिळाले.

FMS दिल्लीची टीम ट्रीफेक्टा हीने ग्राहकांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी सोल्यूशन आणि सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा अनुभव देणारे सोल्युशन सादर करून तिसरा क्रमांक मिळवला. या टीमने 100,000 रूपये रोख पारितोषिक मिळवले.

यावर्षी सुद्धा सर्व सहभागींच्या सुरक्षेसाठी, सॅमसंग E.D.G.E. कॅम्पस प्रोग्राम व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता. व्हर्चुअल फिनाले ला सॅमसंग SWA चे अध्यक्ष आणि सीईओ केन कांग आणि सॅमसंग इंडियाच्या इतर वरिष्ठ नेतृत्व असलेले दिग्गज उपस्थित होते.

सॅमसंग इंडियाचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख समीर वाधवान म्हणाले, “सॅमसंग मध्ये, आम्ही नेहमीच जगाला उत्तम बदल देण्यासाठी नवकल्पनांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो आणि सॅमसंग E.D.G.E. या आमच्या दुसऱ्या यशस्वी कॅम्पस वर्षाचा निकाल जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो. व्यासपीठ म्हणून, सॅमसंग E.D.G.E. चा भविष्यातील अग्रेसर नेतृत्वांना शोधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा प्रयत्न आहे आणि वर्षानुवर्षे सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आणि या सेशन ला आकर्षक नवकल्पक सोल्युशन सादर झाल्यामुळे आम्हाला फार आनंद आहे.”

सॅमसंग E.D.G.E. हा राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पस व्यासपीठ आहे जो हजारो प्रज्ञावंतांना त्यांचे व्यवसाय कौशल्य, योजनात्मक वितार आणि नेतृत्व कौशल्य प्रत्येक वर्षी सादर करण्याची संधी देतो. २०१६ मध्ये चालू झालेल्या या प्रोग्रामने सर्वोत्कृष्ठ संस्थांमधून बी-स्कूल, इंजीनीरींग अँड डिझाईन इन्स्टिट्युट यांमधून प्रज्ञावंतांना वास्तव वेळेतील आव्हाने दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय देण्यासाठी एकत्र आणले आहे. हा प्रोग्राम देशातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना त्यांचे प्रावीण्य दाखविण्याची, अर्थपूर्ण दृष्टीकोन देण्याची आणि त्यांच्या करियरची सुरूवात करण्याची संधी देतो.

कठोर मुल्यांकनानंतर तीन फेऱ्यांनंतर या २ महिन्याच्या प्रोग्रामचा निकाल देण्यात आला. यावर्षी २० महाविद्यालयांमधून १,७०० टीमने सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक सहभागी टीमने संपूर्ण संशोधन आणि कल्पनांनंतर सारांश सादर करायला होता. मुल्यांकनानंतर, प्रत्येक कँपस मधून एक टीम निवडली गेली. त्यांनी केस स्टडीवर कार्य केले, विभागीय फेरीमध्ये त्यांचे तपशीलवार सोल्युशन सादर आणि सबमीट केले. यावर्षी, नऊ टीमची यादी करण्यात आली आणि त्यांचे राष्ट्रीय फेरीत सर्वोत्कृष्ठ ३ निवडण्यासाठी सॅमसंगच्या दीग्गजांकडून निरीक्षण करण्यात आले.