किरीट सोमय्या यांच्या मुलाला केवळ १४ महिन्यात पीएचडी पदवी

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची चिरंजीव नील सोमय्या यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी नुकतीच बहाल करण्यात आली. पीएच.डीसाठी नोंदणी केलेल्या प्रमाणपत्रावरील तारखेनुसार विद्यापीठाने त्यांना १४ महिन्यांत पदवी दिल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे कुटुंब नेहमीच वादात असतात. राज्यातील अनेक नेत्यांची त्यांनी भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना भाग पडले. त्यातच आता त्यांच्या मुलाची पीएच.डी पदवी वादात सापडली आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची चिरंजीव नील सोमय्या (Neil Somaiya) यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी (Ph.D. Degree) नुकतीच बहाल करण्यात आली. पीएच.डीसाठी नोंदणी केलेल्या प्रमाणपत्रावरील तारखेनुसार विद्यापीठाने त्यांना १४ महिन्यांत पदवी दिल्याने सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरू आहेत.

    विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ही पदवी खूप कमी वेळात देण्यात आली असल्याचा दावा करत यासंदर्भात कुलगुरूंकडे (Vice Chancellor) एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रमाणपत्रावर त्यांनी १ जानेवारी २०२१ रोजी नोंदणी केली होती आणि त्यानंतर १७ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाली आहे. नील सोमय्या यांना विद्यापीठ नियमानुसारच पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे, असे त्यांचे मार्गदर्शक तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी स्पष्ट केले.