शाळांची पहिली घंटा आज वाजणार

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने गेल्या दोन-अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ शाळा सुरू होत्या. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online Education) शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. कोरोना (Corona) आणि त्यानंतर लाॅकडाऊन (Lockdown) यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

    उन्हाळ्याच्या सुट्टी(Summer Season)नंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. राज्यातील राज्य शिक्षण महामंडळा(MSBSHSE)च्या शाळा सुरु होणार आहेत. शाळा जरी १३ जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावा, असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते.

    देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने गेल्या दोन-अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ शाळा सुरू होत्या. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online Education) शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. कोरोना (Corona) आणि त्यानंतर लाॅकडाऊन (Lockdown) यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

    शाळा जरी १३ जून रोजी सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावा, असे आदेशात देण्यात आले होते. १३ आणि १४ जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि कोरोनासंदर्भात उद्बोधन करायचे आहे, असे आदेशात म्हटले आहे. तर, विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत.