नौदलातील अग्निवीर यांच्या भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरु

नौदलातील अग्निवीर MR, SSR यांची नोंदणी सुरू झाली असून, भरतीसाठी agniveernavy.cdac.in वर करू शकतात अर्ज

  भारतीय नौदल अग्निवीर (MR) भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार हे मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक (वर्ग 10) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावे. तसेच, नेव्ही अग्निवीर (एसएसआर) भरतीसाठी, उमेदवारांनी वरिष्ठ माध्यमिक (वर्ग 12) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  भारतीय नौदलात अग्निवीरात भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी कि, भारतीय नौदलाने अग्निवीर (MR) – 02/2024 बॅच आणि अग्निवीर (SSR) – 02/2024 बॅचच्या भरतीसाठी 13 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नौदल अग्निवीर भरतीमध्ये इच्छुक असलेले उमेदवार ते येत्या 27 मे 2024 पर्यंत अधिकृत असलेली पोर्टल agniveernavy.cdac.in वर ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात.

  भरतीसाठी पात्रता –

  • भारतीय नौदल अग्निवीर (MR) भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार हे मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक (वर्ग 10) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावे. तसेच, नेव्ही अग्निवीर (एसएसआर) भरतीसाठी, उमेदवारांनी वरिष्ठ माध्यमिक (वर्ग 12) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दोन्ही श्रेणींमध्ये अग्निवीर भरतीसाठी, उमेदवार यांचा जन्म 1 नोव्हेंबर 2003 पूर्वी आणि 30 एप्रिल 2007 नंतर झालेला नसेल याची काळजी घ्यावी.
  • भारतीय नौदलात अग्निवीर (MR, SSR) भरतीसाठी उमेदवारांची निवड हि दोन टप्प्यात होईल, पहिल्या टप्प्यात उमेदवारांना नौदल प्रवेश परीक्षा (INET) द्यावी लागेल. ही परीक्षा ऑनलाइन आणि संगणकावर आधारित असून , या परीक्षेत इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्य जागृती विषयातून एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत याची उमेदवारीने नोंद घ्यावी .
  • पहिल्या टप्प्यामधील परीक्षेत कामगिरी यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PFT), लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल. निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार संबंधित भारतीय नौदलात अग्निवीर यावर अधिसूचना पाहू शकतात.