SPPU
SPPU

अभ्यासक्रमात अतिथी प्राध्यापक म्हणून संबंधित विषयातील तज्ज्ञ लाभतील. तसेच प्रत्यक्ष प्रयोगशाळांना भेटी हाही या अभ्यासक्रमातील महत्वाचा भाग आहे. हा अभ्यासक्रम ३२ श्रेयांकाचा आहे. याबाबतची अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र या विभाग व इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट (आयडीएसटी) यांच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यापीठात ‘पीजी डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी २८ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या एक वर्षीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात संरक्षण क्षेत्रातील सर्व मोठ्या तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांची रचना, विकास आणि उत्पादन यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच शस्त्रास्त्र, दारुगोळा, क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल जहाज, जमिनी व समुद्रातील खाणी, पूल रचना, संवाद प्रणाली, अवकाशशास्त्र प्रणाली आदी विषय अभ्यासता येणार आहे.

    या अभ्यासक्रमात अतिथी प्राध्यापक म्हणून संबंधित विषयातील तज्ज्ञ लाभतील. तसेच प्रत्यक्ष प्रयोगशाळांना भेटी हाही या अभ्यासक्रमातील महत्वाचा भाग आहे. हा अभ्यासक्रम ३२ श्रेयांकाचा आहे. याबाबतची अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    भारत संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर होत असून या संरक्षण क्षेत्रात नवीन रोजगाच्या संधीही उपलब्ध होत आहेत. या अभ्यासक्रमामुळे या क्षेत्रातील पायाभूत गोष्टींची माहिती होऊन भविष्यात यामध्ये संशोधन व नवनिर्मिती करणे शक्य होईल.

    - डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ