ग्लोबल टिचर डिसलेंचा राजीनामा नामंजूर; कारवाई प्रलंबित

डिसले गुरुजी अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत, त्यांचे कॉल घेत नाहीत, असा अनुभव आला. त्यांच्या तक्रारी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे आल्या. त्याचवेळी फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा द्यावी म्हणून डिसले प्रशासकीय चौकट सोडून थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांना रजेचा अर्ज परिपूर्ण करून द्यावा, असे त्यांना सांगण्यात आले होते.

    सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले (Global Teacher Ranjeet Singh Disle) यांचा राजीनामा (Resignation) शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी (Primary Education Officer) किरण लोहार यांनी नामंजूर केला आहे. प्रशासकीय कारणास्तव (Administrative Reason) राजीनामा मंजूर केल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, चौकशी समित्यांच्या अहवालात (Inquiry Committee Report) प्रतिनियुक्तीच्या काळातील त्यांची गैरहजेरी (Absent) उघड झाली आहे. त्यामुळे डिसलेंवर कारवाई प्रलंबित (Action Pending) असल्याने राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

    जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (DIET) डिसले गुरुजींना १७ नोव्हेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या काळासाठी प्रतिनियुक्त केले. १८ डिसेंबर २०१७ रोजी त्यांना परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी हजर रिपोर्ट दिला; परंतु त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. शिक्षण संचालकांनी पुन्हा डिसलेंना १ नोव्हेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०२० या काळासाठी पुन्हा त्याचठिकाणी प्रतिनियुक्ती दिली. त्या काळातही ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी त्यांची चौकशी केली.

    चौकशी समितीने दिलेला अहवाल परिपूर्ण नसल्याने डिसलेंवर कारवाई झाली नाही. मात्र, डिसले गुरुजी अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत, त्यांचे कॉल घेत नाहीत, असा अनुभव आला. त्यांच्या तक्रारी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे आल्या. त्याचवेळी फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा द्यावी म्हणून डिसले प्रशासकीय चौकट सोडून थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांना रजेचा अर्ज परिपूर्ण करून द्यावा, असे त्यांना सांगण्यात आले होते.