उत्तर प्रदेशातील मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द

शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये मध्यान्ह भोजन आणि पुस्तकेही मोफत दिली जातात. याशिवाय इतर गरजेच्या गोष्टीही विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. यामुळे शिष्यवृत्ती रोखण्यात आली आहे.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील मदरशात (Madarsa) शिकणाऱ्या पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द (Students Scholarship Cancel) करण्यात आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) सदर निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र, यापुढे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

    शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right To Education Act) पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण (Free Education) दिले जाते. या मदरशांमध्ये मध्यान्ह भोजन आणि पुस्तकेही मोफत दिली जातात. याशिवाय इतर गरजेच्या गोष्टीही विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. यामुळे शिष्यवृत्ती रोखण्यात आली आहे.

    यापुढे फक्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याच विद्यार्थ्यांचे अर्ज पुढे संमतीसाठी पाठवण्यात येतील, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.