शाहरुख खान शिष्यवृत्ती पुन्हा एकदा ‘लाट्रोब युनिव्हार्सिटी’ मध्ये सुरू  

इंडियन फिल्म फेस्टीव्हल ऑफ मेलबोर्नने लाट्रोब युनिव्हार्सिटी बरोबरच्या सहकार्यातून आज भारतातील महिला संशोधकांसाठी आयुष्य बदलून टाकणारी संधी जाहीर केली आहे.

  इंडियन फिल्म फेस्टीव्हल ऑफ मेलबोर्नने लाट्रोब युनिव्हार्सिटी बरोबरच्या सहकार्यातून आज भारतातील महिला संशोधकांसाठी आयुष्य बदलून टाकणारी संधी जाहीर केली आहे. त्या माध्यमातून महत्वाकांक्षी विद्यार्थीनींना जागतिक स्तरावर अर्थपूर्ण प्रभाव टाकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शुभारंभाची ‘ला ट्रोबयुनिव्हार्सिटी पीएचडी शिष्यवृत्ती २०२०’मध्ये भारतीय विद्यार्थी गोपिका कोत्तनथरायील भसी हिला प्रदान करण्यात अल्ली. त्यानंतर तिला २०२२ मध्ये या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. गोपिका ही जगातील मधमाशांच्या लोकसंख्येचेविषाणू, प्रदूषणकरी घटक यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी नवीन तंत्र शोधण्यासाठी संशोधन करत आहे.

  ला ट्रोबयुनिव्हार्सिटीचे कुलपती मा जॉन ब्रम्बीएओ यांनी शाहरुख खान यांनी विद्यापीठाच्या आणखी एका शिष्यवृत्तीला पाठींबा दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारतातील आणखी एका युवतीला या माध्यमातून एक मोठी संधी मिळणार आहे. “ला ट्रोबच्या कृषी विज्ञान क्षेत्रातील जागतिक संशोधनामध्ये गोपिका आधीच महत्त्वाचे योगदान देत आहे. जागतिक अन्नधान्य अशाश्वतेच्या प्रश्नावर काही ठोस मदत करण्याच्या उद्दिष्टाने विद्यापीठ कृषी विद्यान क्षेत्रामध्ये कक्षा उंचावत आहे,” श्री ब्रम्बी म्हणाले.

  ‘जगाला भेडसावत असलेल्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय महिलांनी पुढे यावे यासाठी आणखी एक संधी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांना पर्यावरण निरंतरता, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये त्या माध्यमातून चांगले काम करता येईल,’ ते पुढे म्हणाले. श्री ब्रम्बी म्हणाले कि शाहरुख खान यांनी जनकल्याणामध्ये अतुल्य काम केले आहे त्याने भारावून जात त्यांनी या शिष्यवृत्तीला त्यांचे नाव दिले आहे.

  या शिष्यवृत्तीच्या नोंदणीला आज सुरुवात झाली असून अर्जदार त्यांचे अर्ज २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत करू शकतात. भारतात राहणाऱ्या आणि गेल्या दहा वर्षांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्यामहिला युवतीला यासाठी अर्ज करता येतील. चार वर्षांच्या संशोधनासाठी ही शिष्यवृत्ती असेल आणि त्यासाठी २२५,००० ऑस्ट्रेलियनडॉलर दिले जातील. ही पदवी ला ट्रोबयुनिव्हार्सिटी, मेलबोर्न येथे तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायची आहे. ही शिष्यवृत्ती २०२२ इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबोर्नच्या शुभारंभाचे औचित्य साधून केली गेली.ला ट्रोबयुनिव्हार्सिटी हे शाहरुख खान यांना डॉक्टर ऑफ लेटर्स हे मानद पदवी देणारे पहिले विद्यापीठ आहे. ही पदवी त्यांना २०१९ साली प्रदान करण्यात आली.

  ‘शाहरुख खानला ट्रोबयुनिव्हार्सिटी पीएचडी शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या युवतीला चार वर्षांची ‘ला ट्रोबयुनिव्हार्सिटी पूर्ण शुल्क संशोधन शिष्यवृत्ती मिळेल. तसेच साडेतीन वर्षांची’ला ट्रोबपदवी संशोधन शिष्यवृत्ती मिळेल. ती प्रतिवर्ष २,५०० ऑस्ट्रेलियन डॉलरची असेल आणि त्यातून विद्यार्थिनीला तेथील राहण्याचा खर्च भागवता येईल.

  ला ट्रोब युनिव्हार्सिटीमधील जागतिक दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शन या विद्यार्थिनीला उपलब्ध असेल. त्याशिवाय भारतातून मेलबोर्न येथे जाण्याचा खर्च म्हणून ३००० ऑस्ट्रेलियन डॉलरचे सहाय्यही मिळेल.‘शाहरुख खान ला ट्रोबयुनिव्हार्सिटी पीएचडी शिष्यवृत्तीसाठी इच्छुक उमेदवार २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. या शिष्यवृत्तीसंबंधी सर्व माहिती www.latrobe.edu.au/srk-scholarshipया वेबसाइटवर उपलब्ध आहे.