Stepapp signs cooperation agreement with Goa government implementation of gamified learning in all government and private schools nrvb

या सहकार्यातून स्टेपॲप विद्यार्थ्यांचा शालेय तसेच स्पर्धात्मक परीक्षांमधील परफॉर्मन्स वृद्धिंगत करेल. शिवाय यामुळे डॅशबोर्ड्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरीही शाळांना जोखता येणार आहे. या ॲपमधील कंटेंट इंग्रजीत असेल.

मुंबई : स्टेपॲप (स्टुडंट टॅलेंट एनहान्समेंट प्रोग्राम ॲप्लिकेशन)ला गोव्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये त्यांचे गेमिफाइड लर्निंग ॲपच्या अंमलबजावणीची मान्यता गोवा सरकारकडून मिळाली आहे. स्टेपॲप गोव्यातील ५३६ सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये सुरू करण्यात आले आहे.

या उपक्रमातून राज्यातील ६-१२ या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना तात्काळ लाभ मिळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील अध्यापनाचा भाग म्हणून स्टेपॲपचा समावेश केला जाईल. या सहकार्यातून स्टेपॲप विद्यार्थ्यांचा शालेय तसेच स्पर्धात्मक परीक्षांमधील परफॉर्मन्स वृद्धिंगत करेल. शिवाय यामुळे डॅशबोर्ड्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरीही शाळांना जोखता येणार आहे. या ॲपमधील कंटेंट इंग्रजीत असेल.

गणित आणि विज्ञान या विषयातील संकल्पना समजून घेण्यासाठी गेमिफाइड फॉरमॅटचा वापर करून शिक्षण मजेशीर आणि आनंददायी करण्यासाठीचे स्टेपॲप हे एक गेमिफाइड लर्निंग सोल्युशन आहे. यात अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. जसे की, सोप्या स्वरुपातील परीक्षा, शैक्षणिक कामगिरी जोखणे, विद्यार्थ्यांच्या गतीने शिक्षण, ४०० हून अधिक आयआयटीएन्स आणि डॉक्टरांनी तयार केलेला कंटेंट आणि बक्षिसे आणि कौतुक.

प्रत्येक मुलाच्या स्वप्नांना चालना देणारा घटक बनणे आणि तंत्रज्ञान आणि गेमिफिकेशनचा वापर करून भारतातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाचा वैश्विक लाभ देणे हे स्टेपॲपचे उद्दिष्ट आहे. यातून तयार होणारी हुशार मुलांची पिढी म्हणजे आपल्या देशासाठी मोठी संपत्ती असणार आहे.

उत्क्रांतीचे साधन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टेपॲप हे एक अप्रतिम सोल्युशन आहे. आपण किती आणि काय शिकलो हे ॲपमधील गेमिफिकेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जाणून घेण्यास विद्यार्थी अत्यंत उत्सुक असतात. शिक्षकांनीही फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कारण, स्टेपॲपमुळे त्यांना विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स तपासता येतो.

सुप्रिया नेत्रावळकर, मुख्याध्यापिका, एसपीव्हीडब्ल्यू हायर सेकंडरी स्कूल, गोवा

स्टेपॲपमधील माझ्या टीमचा शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे, यावर विश्वास आहे. यात गोळा होणाऱ्या माहितीमुळे धोरणकर्त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स स्वतंत्रपणे कळतो आणि त्यांना प्रतिभावान मुलांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीसाठी सज्ज करता येते. गोव्यात आम्ही परिणामकारक आणि सहजसोपा शैक्षणिक पर्याय देण्याचे आमचे लक्ष्य गाठू शकलो, याचा आम्हाला आनंद वाटतो.

प्रवीण त्यागी, एज्युइजफन टेक्नॉलॉजीस (स्टेपॲप)चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पेस आयआयटी ॲण्ड मेडिकलचे व्यवस्थापकीय संचालक