
विद्यार्थ्यांनी २९३ कंपन्यांकडून १४३१ जॉब ऑफर स्वीकारल्या. कंपन्यांनी या वेळी इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक ३.६७ कोटी रुपयांची आणि डोमेस्टिकमध्ये १.३१ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या प्लेसमेंट फेज-१ च्या तुलनेत यंदा ३.५५ टक्के अधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत.
मुंबई : आयआयटी बॉम्बेच्या प्लेसमेंट फेज-१ पूर्ण झालं असून यात हजारो विद्यार्थ्यांना त्यांचा ड्रीम जॉब मिळाला आहे. विद्यार्थ्यांना बंपर पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या असून अनेक विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेज मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांनी २९३ कंपन्यांकडून १४३१ जॉब ऑफर स्वीकारल्या. कंपन्यांनी या वेळी इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक ३.६७ कोटी रुपयांची आणि डोमेस्टिकमध्ये १.३१ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या प्लेसमेंट फेज-१ च्या तुलनेत यंदा ३.५५ टक्के अधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी १३८२ आणि २०२०-२१ मध्ये फक्त ९७३ नोकऱ्या मिळाल्या. यंदा विद्यार्थ्यांना सरासरी २३.२६ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. पीएचडी स्कॉलर्सना सर्वाधिक ३६ नोकऱ्या मिळाल्या. यामध्ये सर्वाधिक पॅकेज २९ लाखांचे होते. पीएचडीधारकांना सरासरी १६ लाखांचे पॅकेज मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत या वेळी वित्त व संशोधन व विकास क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या पगारात वाढ झाली.
क्षेत्रनिहाय सरासरी मिळाले पॅकेज :
क्षेत्र सरासरी सीटीसी
इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी २१. २० लाख रु.
आयटी/सॉफ्टवेअर २४.३१ लाख रु.
फायनान्स ४१.६६ लाख रु.
संशोधन आणि विकास ३२. २५ लाख रु.
कन्सल्टिंग १७.२७ लाख रु.
६५% प्री-प्लेसमेंट ऑफर स्वीकारल्या :
यंदा ३०० प्री-प्लेसमेंट ऑफर प्राप्त झाल्या. पैकी १९४ विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या. गेल्या वर्षी कंपन्यांनी २४८ प्री-प्लेसमेंट ऑफर दिल्या होत्या. पैकी २०२ विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या.