कृतींची दुर्गा घडणे ही आज काळाची गरज आहे : मार्शल आर्टिस्ट पूजा पांडे

विद्यार्थींनी शारिरीक पातळीवर देखील सक्षम असणे फार गरजेचे आहे. आज पूजा पांडे स्वतः कराटे ब्लॅक बेल्ट असल्याने त्यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले. एक टी.व्हीवरील कार्यक्रम कमी बघा पण स्वतःला व्यायामाची, कराटे शिकण्याची सवय लावा. ‘उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो अब गोविन्द न आयेंगे ।’ असे म्हणणारे आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढली.

    ‘‘ नवदुर्गा ही फक्त विचारांची नाही तर प्रत्यक्ष कृतींची दुर्गा घडणे ही आज काळाची गरज आहे. मुली आज सगळ्याच पातळ्यांवर आघाडीवर आहे मग प्रत्यक्ष स्वसंरक्षणामध्ये देखील प्रत्येक मुलींनी पुढे असलेच पाहिजे. ज्या दिवशी बलात्कार होणाऱ्या स्त्रीने त्या पुरूषास स्वहिंमतीने धडा शिकविला अशी बातमी येईल तोदिवस नवदुर्गांसाठी विजयादशमीचा ठरेल’’ असे उदगार सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती. मणिबेन एम.पी शाह कला आणि वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित ‘नवदुर्गा : नवविचार’ह्या व्याख्यानमालेच्या चौथ्या व्याख्यात्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या पूजा पांडे यांनी काढले.

    विद्यार्थींनी शारिरीक पातळीवर देखील सक्षम असणे फार गरजेचे आहे. आज पूजा पांडे स्वतः कराटे ब्लॅक बेल्ट असल्याने त्यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले. एक टी.व्हीवरील कार्यक्रम कमी बघा पण स्वतःला व्यायामाची, कराटे शिकण्याची सवय लावा. ‘उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो अब गोविन्द न आयेंगे ।’ असे म्हणणारे आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. कोणत्याही पुरूषाच्या मदती शिवाय स्वसंरक्षण करणे ही काळाची गरजच आहे,असे म्हणतं ‘स्वसंरक्षण’ हा विषय समजून सांगताना प्रत्यक्ष मार्शल आर्टस् मधील काही प्रात्यक्षिक विद्यार्थींनीना करून दाखविले.

    सदर कार्यक्रमात महाविद्यालय आणि मराठी विभागातर्फे प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. रश्मी शेटये-तुपे यांनी केले. तर सूत्रसंचालन गोड व लाघवी आवाजात माधवी पवार ह्या विद्यार्थींनीने केले. प्रियंका जोगदंड ह्या विद्यार्थींनीने उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम गुगल-मीटवर ई-पध्दतीने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील प्रा.वसंत पानसरे आणि प्रा.रश्मी शेटये-तुपे यांनी अथक परिश्रम घेतले.