Young adult woman in studio shots making facial expressions and using fingers and hands
Young adult woman in studio shots making facial expressions and using fingers and hands

तुम्ही जर 12वी उत्तीर्ण झाला असाल किंवा निकालाची वाट पाहत असाल आणि पुढील अभ्यासासाठी पर्याय शोधत असाल, तर हे कोर्स तुम्हाला नोकरीसाठी सर्वोत्तम ठरू शकतात.

  जवळपास सर्वच बोर्डाचे बारावीचे निकाल आले आहेत. तुम्ही जर 12वी उत्तीर्ण झाला असाल किंवा निकालाची वाट पाहत असाल आणि पुढील अभ्यासासाठी पर्याय शोधत असाल, तर हे कोर्स तुम्ही नोकरीसाठी निवडू शकतात. असे काही कोर्स हे तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील तसेच तुम्हाला अनेक विविध कोर्सेसबद्दल माहित उपलब्ध होईल, जेणेकरून तुम्ही योग्य कोर्स निवडू शकता. आणि तुमच्या स्वप्नांना सहजपणे वाट मिळेल.

  आर्टिफिशियल इंटेलिजन्स
  जर तुम्हाला AI मध्ये स्वारस्य इंटरेस्ट असेल तर या क्षेत्रात डिप्लोमा करू शकता. तसेच या कोर्समध्ये सर्टिफिकेटपासून मास्टर डिग्रीपर्यंत विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळू शकते.

  सायबर सिक्युरिटी
  सायबर सिक्युरिटी कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना पासवर्ड सुरक्षित कसे ठेवायचे, डिजिटल पेमेंट्सची सुरक्षा आणि ते कसे टाळायचे हे शिकवले जाते. सायबर हल्ला म्हणजे काय आणि ते कसे टाळायचे याशिवाय सायबर कायदा अशा अनेक सायबर संदर्भातील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. हा कोर्स विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडतो.

  सीए आणि सीएस
  तुम्ही एक कॉमर्सचे या कोर्सचे विद्यार्थी असाल तर तुम्ही सीए किंवा कंपनी सेक्रेटरी होऊ शकता. MNC सोबत काम करण्याचा हा एक चांगला पर्याय तुम्हाला मिळू शकतो. कारण यामध्ये संपूर्ण कार्यालयीन कामकाज चालते. तुम्हाला याची आवड असेल तर नक्की हा कोर्स निवडा.

  आर्किटेक्टर
  आर्किटेक्ट बनणे ही इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बी.आर्कचा अभ्यासक्रम पूर्ण करावा.आणि त्यानंतर B.Arch अभ्यासक्रम हे 5 वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम
  उपलब्ध आहेत. हे केल्यानंतर, तुम्ही देशात किंवा परदेशातील कोणत्याही मोठ्या बांधकाम समूहासोबत काम करू शकता.

  डिजिटल मार्केटिंग
  हा एक कोर्स आहे. ज्यामध्ये अंतर्गत ऑनलाइन सोशल मीडियाद्वारे कोणत्याही सेवा किंवा उत्पादनाची जाहिरात करण्याच्या धोरणाबद्दल प्रशिक्षण दिले जाते. घरून काम करण्याची ही एक उत्तम संधी मिळू शकते. तसेच हे संपूर्ण काम संगणकावर केले जाते.