विद्यापीठाकडून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन !

मुंबई: २०२०-२१ चे शैक्षणिक वेळापत्रक नुकतेच मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात असून हे वेळापत्रक जाहीर करताना विद्यापीठाकडून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन हाेत असल्याचा आरोप बुक्टू संघटनेकडून करण्यात आला आहे. प्रथम वर्षाच्या ऑनलाईन वर्गाबाबत कोणतेही परिपत्रक न काढता तसेच ९० दिवस वर्ग न घेतल्याचा आरोप बुक्टूकडून केला जात आहे.

कोरोनामुळे प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियेला उशीरा सुरुवात झाली अाहे. परिणामी फारच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे मुदतवाढ देत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामुळे सप्टेंबरमध्ये वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक जारी केले. त्यानुसार महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करणे शक्य झाले नाही. विद्यापीठाकडून द्वितीय आणि तृतीय वर्षाचे ऑनलाईन वर्ग ७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. तसेच प्रथम वर्षाचे ऑनलाईन वर्ग हे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश यूजीसीने दिले होते. पण मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुतांश महाविद्यालयांनी ऑक्टोबरमध्येच ऑनलाईन वर्ग सुरू केले. हे वर्ग सुरू करण्याबाबत विद्यापीठाने अद्यापपर्यंत कोणतेही परिपत्रक काढलेले नाहीये, ऑनलाईन वर्गाशी जुळवून घेण्यास विद्यार्थ्यांना वेळ देणे अपेक्षित आहे. तसेच ९० दिवस वर्ग घेणे गरजेचे आहे, असे असतानाही विद्यापीठाने जारी केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाचे ९० दिवस वर्ग पूर्ण होत नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण होत नाहीये, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करताना मुंबई विद्यापीठाकडून यूजीच्या नियमांचे उल्लंघन आणि गैरव्यवस्थापन केले असल्याचा आरोप बुक्टूचे अध्यक्ष जी.बी. राजे आणि महासचिव मधू परांजपे यांनी केला आहे