अजब न्याय! हिंदू मुलांनी कपाळावर कुंकू लावल्याने ‘या’ शाळेत मिळते शिक्षा; आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांचा शाळेला दणका

दिव्यातील सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल, दातिवली ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेत कपाळावर टिळा लावून आलेल्या पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा भरताना बाजूला काढले जाते. नंतर शाळा पूर्ण भरल्यावर त्या विद्यार्थ्यांना टिळा (कुंकू) का लावून आलास याचा जाब विचारला जातो.

दिवा : ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे.’ या आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात रान पेटलेलं असतानाच दिव्यातील सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल, दातिवली (Symbiosis Convent High School in Dativali, Diva) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदू मुलांनी शाळेत जाताना कपाळावर कुंकू लावल्याने (Hindu children for applying kunkum on their foreheads) या शाळेतील लहान मुलांना शिक्षक शिक्षा (Teachers Punishment To Students) करतात ही बाब आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाच्या (To the office bearers of Agri Koli Sangharsh Samiti and Bajrang Dal) पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारत व्यवस्थापनाला दणका दिला.

दिव्यातील सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल, दातिवली ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेत कपाळावर टिळा लावून आलेल्या पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा भरताना बाजूला काढले जाते. नंतर शाळा पूर्ण भरल्यावर त्या विद्यार्थ्यांना टिळा (कुंकू) का लावून आलास याचा जाब विचारून ६० ते ७० उठाबशा, मैदानात ५ ते ६ फेऱ्या मारणे, अर्धा तास गुडघ्यावर चालणे आणि हातावर पट्टीने मारणे असे प्रकार रोज होत असत.

या सर्व शिक्षा झाल्यावर त्या ४ ते ५ विद्यार्थ्यांना एका तासाने वर्गात सोडले जात होते. ह्या रोजच्या शिक्षेला कंटाळून विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले. नंतर त्या पालकांनी आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना हे सांगितले.

ही होणारी शिक्षा चुकीची असल्याने आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी संगटित होऊन शाळेत जाऊन हल्लाबोल केला. या शिक्षेवर शाळेच्या प्रशासनाला खडे बोल सुनावले गेले. पुन्हा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षा झाल्यास शाळेची रीतसर पोलीस तक्रार करण्यात येईल असा जबर इशारा ही त्यावेळी देण्यात आला.

शाळेची बाजू समजून घेण्यासाठी मधू परिडा, मुख्याध्यापिका आणि कमलराज देव, चेरमेन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कोणतेही उत्तर देण्याचे टाळले.

आगरी कोळी संघर्ष समिती व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन तिथल्या मॅनेजमेंटला अद्दल घडवली. त्यावेळी किरण कृष्णा दळवी, विराज पाटील, सचिन भोईर, विनोद भगत, नयन भगत, वैभव पाटील, सोपान म्हात्रे, कुशल पाटील, अनुप म्हात्रे, दिलीप भोईर, रोशन भगत, जयदीप भोईर, निलेश म्हात्रे, धर्मेंद्र शेलार, वैभव बेडेकर, साई पाटील, आकाश डबरे, धीरज पाटील, सोपान म्हात्रे, रितेश मढवी, प्रवीण म्हात्रे, प्रवीण तांडेल, योगिता नाईक उपस्थित होते.

या शाळेत होणाऱ्या शिक्षेचा प्रकार मला दिवा आंजूर फाट्यावरील एका गाववाल्याने फोन करून सांगितला. नंतर लगेच मी आगरी कोळी संघर्ष समिती आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आम्ही सर्वजण शाळेतील मुख्याध्यापकांना जाब विचारण्यासाठी गेलो.

– किरण कृष्णा दळवी, आगरी कोळी संघर्ष समिती पदाधिकारी, दातिवली