आकर्षणाच्या मोहात न अडकता ध्येयाकडे वाटचाल करा : डॉ. तक्षशिला मोटघरे

महाविद्यालयात प्रवेश घेत असताना विद्यार्थींनी अशा एका टप्प्यावर असतात की त्यांच्यात काही शारीरिक, मानसिक बदल घडत असतो, त्यात भर पडते ती प्रसार माध्यमांची. प्रसार माध्यमांचा (टिक टॉक,फेसबुक, व्हाट्सएप, इनस्टा ग्राम इ.) मोह तसेच ह्या वयात छान दिसणे, खूप मित्रमंडळी असणे, अनोळखी मित्रांसोबत चॅट करणे ह्या साऱ्या गोष्टी आवश्यक वाटतात. अशावेळीच विद्यार्थींनीं स्वतःवर बंधन ठेवणे फार गरजेचे आहे.

    महाविद्यालयीन शिक्षणामुळे तुमच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळत असते. शाळा संपल्यावर महाविद्यालयीन वातावरणात येत असताना विद्यार्थींनी मुक्ततेकडे झुकलेल्या दिसतात. परंतु येथेच विद्यार्थींनी स्वतःचे ध्येय ठरविले पाहिजे. आज आपण कोणाचे तरी आदर्श समोर ठेवून पुढे वाटचाल केली पाहिजे. आकर्षणाच्या मोहात न अडकता ध्येयाकडे वाटचाल करून भविष्यात अनेकांसाठी आपण प्रेरणास्थान झाले पाहिजे.’’असे उदगार सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती. मणिबेन एम.पी शाह कला आणि वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित ‘नवदुर्गा : नवविचार’ ह्या व्याख्यानमालेच्या सहाव्या व्याख्यात्या डॉ.तक्षशिला मोटघरे यांनी काढले.

    महाविद्यालयात प्रवेश घेत असताना विद्यार्थींनी अशा एका टप्प्यावर असतात की त्यांच्यात काही शारीरिक, मानसिक बदल घडत असतो, त्यात भर पडते ती प्रसार माध्यमांची. प्रसार माध्यमांचा (टिक टॉक,फेसबुक, व्हाट्सएप, इनस्टा ग्राम इ.) मोह तसेच ह्या वयात छान दिसणे, खूप मित्रमंडळी असणे, अनोळखी मित्रांसोबत चॅट करणे ह्या साऱ्या गोष्टी आवश्यक वाटतात. अशावेळीच विद्यार्थींनीं स्वतःवर बंधन ठेवणे फार गरजेचे आहे.

    आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव होणे गरजेचे आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे विचार व आईच्या संस्कारांमुळे मी ह्या पदापर्यंत पोहचले आहे, असे स्वानुभव सांगता सांगता डॉ.तक्षशिला मोटघरे यांनी ‘युवतींचे मानसशास्त्र’ ह्या विषयाची मांडणी विद्यार्थींनीशी समोर केली. सदर कार्यक्रमात महाविद्यालय आणि मराठी विभागातर्फे प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. किरण जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन गोड व लाघवी आवाजात माधवी पवार ह्या विद्यार्थींनीने केले. प्रियंका जोगदंड ह्या विद्यार्थींनीने उपस्थितांचे आभार मानले.

    सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम गुगल-मीटवर ई-पध्दतीने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील प्रा.वसंत पानसरे आणि प्रा.रश्मी शेटये-तुपे यांनी अथक परिश्रम घेतले.